Home Breaking News सावधान…वणीत पुन्हा आढळले कोरोनाचे दोन रुग्ण

सावधान…वणीत पुन्हा आढळले कोरोनाचे दोन रुग्ण

1988

यवतमाळ प्रयोग शाळेत केली तपासणी

कोरोनाची दुसरी लाट ओसारताच नागरिक बिनधास्त झाले होते. कोविड त्रिसूत्रीचे पालन पूर्णतः विसरले आणि दबा धरून बसलेल्या कोरोनाने डाव साधला. दि. 27 नोव्हेंबर ला वणीत दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने चांगलीच खळबळ माजली आहे.

Img 20250601 wa0036

ऑगस्ट महिन्यानंतर कोरोनाचा एकही रुग्ण शहरात तसेच तालुक्यात आढळला नाही. त्यामुळे प्रशासनाने सुटकेचा श्वास सोडला होता मात्र सतर्क राहून कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासन नागरिकांना करत होते.मात्र 12 नोव्हेंबर ला विठ्ठलवाडी परिसरात दोन रुग्ण आढळले होते.त्यामुळे एकाच महिन्यात चार बाधित झाल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

Img 20250103 Wa0009

कोरोनाचा विळखा सम्पूष्टात आल्याचे ग्राह्य धरून नागरिकांनी कोविड नियमांचे पालन करणे सोडून दिले होते. सणासुदीच्या दिवसात बाजारात तुफान गर्दी आढळून आली. व्यावसायिकांनी देखील कोविड नियमांचे पालन तंतोतंत केले नाही.

वणी शहरातील दोघांना कोरोनाचे लक्षणे जाणवत असल्याने त्यांनी यवतमाळ येथील प्रयोग शाळेत तपासणी केली होती.दि 27 नोव्हेंबर ला त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. प्रशासनाने त्यांच्याशी संपर्क केला असता आम्ही गुजरात येथे असल्याचे सांगण्यात येत आहे.ते शहरातील कोणत्या परिसरातील आहे याची माहिती मिळू शकली नाही.त्यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली असून नागरिकांनी कोविड त्रिसूत्रीचे पालन करून लसीकरण करण्याचे आवाहन प्रशासना कडून करण्यात येत आहे.

वणी: बातमीदार