Home Breaking News दुचाकीचा अपघात, दोन तरुण गंभीर जखमी

दुचाकीचा अपघात, दोन तरुण गंभीर जखमी

IMG 20260522 WA0013

बेलोरा फाट्याजवळील घटना

वणी: खाजगी बी-बियाणे कंपनीत मार्केटिंग चे काम करणारा तरुण व त्याचा मित्र वणी वरून घुग्गुस मार्गे चंद्रपूरला दुचाकीने जात होते. बेलोरा फाट्याजवळ दुचाकी अनियंत्रित झाली आणि दिशादर्शक फलकावर आदळली. या अपघातात दोघेही तरुण गंभीर जखमी झाले असून ही घटना मंगळवार दि.28 जूनला दुपारी घडली.

सचिन डोंगे (27) व गणेश वांढरे (26) असे गंभीर जखमींची नावे आहेत. ते दोघेही वांजरी येथील रहिवाशी आहे. काही कामानिमित्त चंद्रपूर ला दुचाकी क्रमांक (MH-29- BA-8705) ने जात असताना अपघात झाला.

IMG 20260511 WA0005

घटना घडताच नागरिकांनी एकच गर्दी केली, प्रत्यक्षदर्शीने शिरपूर पोलिसांना सूचना दिल्या. तर काही नागरिकांनी त्याला तात्काळ चंद्रपूरला उपचारार्थ हलविण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने दोघांनाही खाजगी रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती असून बुधवारी सचिन वर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे समजते.
वणी: बातमीदार

Img 20250103 Wa0009