Home Breaking News भरधाव कार डिव्हायडरवर आदळली

भरधाव कार डिव्हायडरवर आदळली

● सर्व प्रवाशी किरकोळ जखमी

C1 20260201

सर्व प्रवाशी किरकोळ जखमी

Wani News :
तालुक्यातील झोला शिवारात रविवारी सायंकाळी सुमारे 4 वाजताच्या दरम्यान भरधाव कार अनियंत्रित होऊन रस्त्यावरील डिव्हायडरवर जोरदार आदळल्याची घटना घडली. या अपघातात कारमधील सर्व प्रवासी किरकोळ जखमी झाले असून सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. All passengers in the car suffered minor injuries.

कुचना येथे वास्तव्यास असलेले घनश्याम चोपणे हे आपल्या परिवारासह वाहन क्रमांक MH-34-CJ-6028 ने गावी परतत होते. वाहन वेगात असल्याने झोला शिवारातील वळणावर त्यांचे वाहनवरील नियंत्रण सुटले व वाहन डिव्हायडरवर आदळले. अपघाताची तीव्रता मोठी असली तरी वाहनातील सर्वच प्रवासी थोडक्यात बचावले.

IMG 20260511 WA0005

या वाहनात दोन लहान मुले देखील प्रवास करत असल्याची माहिती असून अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतकार्य करत जखमींना बाहेर काढले. सर्व जखमींना रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. तसेच पोलिसांना सूचित करण्यात आले. वाहतूक शाखेच्या पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पुढील तपास आरंभला आहे.
Rokhthok

Img 20250103 Wa0009