● मोदींच्या आवाहनाला हंसराज अहीर यांचा प्रतिसाद, सुरक्षा ताफ्यातील एस्कॉर्ट वाहन वापरणार नाहीत…..
Political News | पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर (Hansraj Ahir) यांनी आपल्या सुरक्षा ताफ्यातील पोलिसांच्या एस्कॉर्ट वाहनाचा वापर न करण्याचा निर्णय देशहितासाठी घेतला आहे. And….’Bhaiyya’ stepped forward for the good of the country…!

इराण-अमेरिका-इस्राईल संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होत असून त्याचे पडसाद भारतातील पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या आयातीवर उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री मोदी यांनी देशातील नागरिकांना इंधन आणि गॅसचा वापर कमी करण्याचे आवाहन केले आहे. त्याला त्वरित प्रतिसाद देत माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी इंधन बचतीचा संदेश देणारा निर्णय जाहीर केला.
हंसराज अहीर यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी केलेल्या आवाहनाला प्रत्येक नागरिकाने सकारात्मक प्रतिसाद द्यायला हवा. इंधन बचतीचा छोटासा प्रयत्नही देशहितासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. त्यामुळे मी माझ्या सुरक्षा ताफ्यातील एस्कॉर्ट वाहन न घेण्याचा निर्णय घेतला असून, आवश्यकतेनुसारच वाहनांचा वापर करणार आहे.”
अहीर यांच्या या निर्णयाचे विविध स्तरांतून स्वागत करण्यात येत असून, राजकीय पुढाऱ्यांनी देशहित सर्वतोपरी समजून पंतप्रधानांनी केलेल्या आवाहणाची अंमलबजावणी करणे गरजेचे झाले आहे. इंधन, खाद्यतेल याची बचत केल्यास भविष्यात ते आपल्याच उपयोगी पडणारे असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.






