● नांदेकरांनी फोडला भाजपचा मोहरा!
Big Breking :
वणी तालुक्यातील भाजपचा प्रबळ मोहरा अखेर फुटला आहे. भाजप जिल्हा उपाध्यक्ष ऍड. कुणाल चोरडिया यांचे वडील व ज्येष्ठ नेते विजय चोरडिया यांनी आज अधिकृतरीत्या उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. Big News: Vijay Chordia ‘in Shiv Sena Shinde group’
मुंबईत पार पडलेल्या प्रवेश सोहळ्यात उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत चोरडिया यांचा पक्षप्रवेश संपन्न झाला. या प्रसंगी माजी आमदार विश्वास नांदेकर यांनी त्यांचे स्वागत करून “वणी तालुक्यात शिवसेना अधिक बळकट होणार” असा “विश्वास” व्यक्त केला.

चोरडिया यांच्या प्रवेशामुळे स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली असून, वणी तालुक्यात भाजपला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. विश्वास नांदेकरांनी पुन्हा एकदा आपली राजकीय चाल आणि पुढील रणनीती अधोरेखित केली आहे. चोरडिया यांच्या प्रवेशामुळे वणी तालुक्यात नवे राजकीय समीकरण तयार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Rokhthok






