Home Breaking News अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी

अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी

● उभ्या ट्रकला दुचाकींचा जबर धडक, वणी- मारेगाव मार्गावरील घटना...

C1 20260814

● उभ्या ट्रकला दुचाकींचा जबर धडक, वणी- मारेगाव मार्गावरील घटना…

ROKHTHOK :  वणी-मारेगाव मार्गावरील गौराळा फाट्याजवळ रस्त्यात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीने मागून जबर धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. या अपघातात त्याचा एक हात शरीरापासून पूर्णपणे तुटला. ही घटना 13 ऑगस्ट रोजी रात्री साडेसातच्या सुमारास घडली. Biker seriously injured in accident

शुभम रवींद्र ठावरी (21) असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो आष्टी तालुका वरोरा जि. चंद्रपूर येथील निवासी असून बजाज फायनान्स कंपनीत कार्यरत आहे. शुभम हा मारेगाव येथील काम आटोपून दुचाकीने वणीकडे येत होता. गौराळा फाट्याजवळ रस्त्यात उभ्या असलेल्या ट्रकचा अंदाज न आल्याने त्याची दुचाकी ट्रकवर आदळली.

अपघातानंतर नागरिकांनी तातडीने मदत करत शुभमला वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.

Img 20250103 Wa0009

वणी-मारेगाव मार्गावर कोलडेपो, कोळसा स्टॉकयार्ड, गॅरेज, ट्रान्सपोर्ट कंपन्या, वेल्डिंग दुकाने तसेच गौराळा फाट्याजवळील चुनखडीच्या खाणीमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. या मार्गावर अनेकदा वाहने रस्त्यावरच सदोदित उभी केली जात असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.

विशेषतः रात्रीच्या वेळी कोणतीही सुरक्षा व्यवस्था किंवा वाहन दिसण्यासाठी आवश्यक संकेत न लावता रस्त्यावर वाहने उभी केली जात असल्याने भीषण अपघात घडत आहेत. त्यामुळे रस्त्यावर वाहने उभी करणाऱ्या चालकांवर दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.