● औचित्य मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचे
Political News : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्यभर आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान महायज्ञाला वणी येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्वात बुधवारी बाजोरिया हॉल, येथे आयोजित रक्तदान शिबिरात 412 नागरिकांनी नोंदणी केली. वैद्यकीय तपासणीनंतर 272 रक्तदात्यांचे रक्त संकलित करण्यात आले. Blood Donation Mahayagna: 272 units of blood collection
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व जिल्हाध्यक्ष ऍड. प्रफुल चव्हाण यांच्या संकल्पनेतून आयोजित या उपक्रमाचे आयोजन भाजप वणी शहर, वणी ग्रामीण पूर्व व वणी ग्रामीण पश्चिम यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. हेडगेवार रक्तकेंद्र, नागपूर यांच्या सहकार्याने हे शिबिर पार पडले.
शिबिरात वणी शहरातून 205 जणांनी नोंदणी करून 152 जणांनी रक्तदान केले. वणी ग्रामीण पूर्व भागातून 132 जणांची नोंदणी झाली असून 70 जणांनी रक्तदान केले. तर वणी ग्रामीण पश्चिम भागातून 75 जणांनी नोंदणी करून 50 जणांनी रक्तदान केले.
शिबिराला माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, ज्येष्ठ किसान नेते दिनकर पावडे, ज्येष्ठ कामगार नेते विजय पिदुरकर, माजी जिल्हाध्यक्ष राजू डांगे, तारेंद्र बोर्ड, ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष पवन एकरे तसेच माजी जिल्हा परिषद गट नेत्या मंगला पावडे यांनी भेट देऊन कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नगराध्यक्ष विद्याताई आत्राम, उपाध्यक्ष राकेश बुग्गेवार, विधानसभा प्रमुख संजय पिंपळशेंडे, जिल्हा उपाध्यक्ष रवी बेलुरकर, रक्तदान अभियान विधानसभा संयोजक अंकुश बोडे, संतोष डंभारे, नितीन वासेकर, गजानन विधाते, लिशा विधाते, जयमाला दरवे, संध्याताई लोडे यांच्यासह भाजपच्या विविध पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
दिवसभर पावसाची रिपरिप सुरू असतानाही नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान केल्याने शिबिराला विशेष यश मिळाले. कार्यक्रमाचे संचालन भारती बदखल यांनी तर आभार प्रदर्शन वैशाली वातिले यांनी केले.
ROKHTHOK






