Home Breaking News वीज पडून शेतकरी पुत्राचा मृत्यू, दोन गंभीर

वीज पडून शेतकरी पुत्राचा मृत्यू, दोन गंभीर

● तेजापूर येथील हृदयद्रावक घटना

C1 20250806 17150075

तेजापूर येथील हृदयद्रावक घटना

Sad News
बुधवारी सकाळी सुमारे 11:30 वाजता तेजापूर येथील शेतामध्ये विज पडून एक तरुण ठार, तर दोघे गंभीर जखमी झाल्याची दुर्घटना घडली. मुकुटबन पोलीस स्टेशन हद्दीतील ही हृदयद्रावक घटना आहे. Farmer’s son dies after being struck by lightning, two others critically injured

मिळालेल्या माहितीनुसार, तेजापूर येथील शेतकरी सुधाकर भगत यांचा पुत्र धम्मरत्न सुधाकर भगत (23) हा शेतात बैल चारत असताना अचानक आभाळ भरून आले. वीजा चमकल्याने आणि पावसाला सुरुवात झाल्याने त्याने शेतातील झोपडीत आसरा घेतला. त्याच वेळी झोपडीवर वीज कोसळल्याने तो जागीच ठार झाला.

IMG 20260511 WA0005

आणि….कामचुकार अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले

या घटनेत त्याच्या सोबत असलेले गजानन दिवाकर कोंडेकर (24) आणि पूनम संजय मालेकर (23) हे दोघे गंभीर जखमी झाले. यातील एकाने तातडीने नातेवाइकांना फोन करून माहिती दिल्यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली व तिघांना तत्काळ वणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

Img 20250103 Wa0009

तेथे डॉक्टरांनी धम्मरत्न भगत याला तपासून मृत घोषित केले. जखमी दोघांवर पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. धम्मरत्न भगत हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या अकाली मृत्यूने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गावात शोककळा पसरली आहे.
Rokhthok

Previous articleआणि….कामचुकार अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले
Next articleआकाशाचा कहर : वीज कोसळून एक गतप्राण
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.