● स्पर्धा परीक्षेची तयारी करत स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे स्वप्न बघणाऱ्या…..
Sad News : सहा महिण्यापूर्वी लग्न झाले, नोकरीवर असलेल्या व्यसनी पतीमुळे संसारात वितुष्ट आले. नवऱ्याचे घर सोडून ती माहेरी आली. स्पर्धा परीक्षेची तयारी करत स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे स्वप्न बघणाऱ्या नवविवाहित आरतीने गळफास का घेतला हे अनाकलनीय आहे. वाढदिवसाच्या मध्यरात्रीच उचललेले टोकाचे पाऊल कुटुंबियांना दुःखसागरात लोटणारे आहेत. It is unclear why newlywed Aarti hanged herself.
आरती जय बुरचुंडे (28), रा. आनंदवन चौक, वरोरा असे मृत नावविहितेचे नाव आहे. तालुक्यातील कुंभारखणी येथील आरतीचा जानेवारी 2025 मध्ये वरोरा येथील जय बुरचुंडे सोबत विवाह झाला होता. जय हा वेकोलीच्या कोलारपिंपरी कोळसा खाणीत कार्यरत आहे. लग्नानंतर दोन महिन्यातच नवरा व्यसनी असल्याचे आरतीला कळले. यामुळे दोघांत खटके उडायला लागले. संसारात वितुष्ट निर्माण झाले आणि तिने माहेरी जाण्याचा निर्णय घेतला.

स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आरतीने स्पर्धा परीक्षा व शिक्षण सुरू ठेवले. वणी येथे अभ्यास करत असताना दररोजचा प्रवास त्रासदायक ठरत असल्याने ती मागील दीड महिन्यापासून साईलीला नगरी येथे वास्तव्यास असलेल्या विवाहित बहिणीकडे राहत होती. शुक्रवारी सर्वजण जेवण करून झोपले. शनिवारी सकाळी तिच्या बहिणीला आरती तिच्या खोलीत दिसली नाही म्हणून तिने वरच्या मजल्यावरील बेडरूमकडे धाव घेतली.
आरती दुपट्ट्याच्या सहाय्याने पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. बहिणीने जोरात हंबरडा फोडला. घरची मंडळी जमा झाली, पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणी साठी पाठवण्यात आले. पुढील तपास पोलीस करताहेत.
Rokhthok News






