Home Breaking News आता लय झालं, नाटकं बंद, चुल्यात गेला तुमचा उड्डाणपूल

आता लय झालं, नाटकं बंद, चुल्यात गेला तुमचा उड्डाणपूल

● स्थानिकांना होणारा त्रास खपवून घेणार नाही ● मनसे नेते राजू उंबरकर यांचा इशारा

C1 20250813 22233047

स्थानिकांना होणारा त्रास खपवून घेणार नाही
मनसे नेते राजू उंबरकर यांचा इशारा

BIG NEWS:
शहरातील चिखलगाव रेल्वे गेट आणि रेल्वे सायडिंग जवळील सुरू असलेल्या रेल्वे उड्डाणपुलांच्या संथगतीने चाललेल्या कामामुळे शहरातील नागरिक, प्रवासी, विद्यार्थी आणि रुग्ण यांचे अक्षरशः हाल होत आहेत. वाहतुकीची प्रचंड कोंडी, चिखल, धुळीचे साम्राज्य आणि सततचा अपघातांचा धोकालक्षात घेता मनसेने आक्रमक पवित्रा अवलंबला आहे. आता लय झालं, नाटकं बंद, चुल्यात गेला तुमचा उड्डाणपूल अशी भूमिका मनसेचे नेते राजू उंबरकर यांनी घेतल्याने संबंधित विभाग बिथरला आहे. MNS has adopted an aggressive stance.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यापूर्वी रेल्वे विभाग आणि संबंधित बांधकाम कंपनीला सर्व्हिस रोडचे काम तातडीने पूर्ण करण्याची स्पष्ट मागणी केली होती. मात्र, सलग 8 दिवस उलटूनही कोणतीही हालचाल करण्यात आली नाही. हा रेल्वे विभाग आणि बांधकाम कंपनीचा नागरिकांच्या जिवाशी खेळण्यासारखा बेजबाबदारपणा असल्याचे स्पष्ट होत आहे.

IMG 20260511 WA0005

मनसेने स्पष्ट इशारा दिला आहे की, वणीकरांना वाहतूककोंडी व जीवघेण्या परिस्थितीत ठेवणाऱ्यांना आता सोडणार नाही. या निषेधार्थ आणि नागरिकांच्या हक्कासाठी दिनांक 14 ऑगस्टला सकाळी 11 वाजता चिखलगाव रेल्वे गेटवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे “अभिनव आंदोलन” होणार आहे.

Img 20250103 Wa0009

या आंदोलनात वणी तालुक्यातील सर्व मनसे पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिक आणि जिवाभावाचे वणीकर मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. वणीकरांच्या सहनशीलतेची परीक्षा घेणाऱ्यांना मनसे आपल्या पद्धतीने उत्तर देईल, असा इशारा तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहकार आणि शहराध्यक्ष अंकुश बोढे यांनी दिला आहे.

“आता लय झालं, नाटकं बंद, चुलीत गेला तुमचा उड्डाणपूल” म्हणजेच कामातील विलंब, गैरसोय, आणि प्रशासनाची उदासीनता यावर उंबरकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला. मनसेने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर संबंधित विभागातील अधिकारी नेमकी काय भूमिका घेणार याकडे आता लक्ष लागले आहे.
ROKHTHOK