● श्री महावीर बहुउद्देशीय संस्थेचा उपक्रम
● आजी- माजी आमदारांची उपस्थिती
Wani News | वणी रेल्वे स्टेशन वरून अप अँड डाऊन धावणाऱ्या रेल्वेतील प्रवाशांना आता मोफत थंडगार शुद्धजल वितरित करण्याचा कौतुकास्पद उपक्रम श्री महावीर बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून सुरू करण्यात आला आहे. रविवारी सुरू करण्यात आलेल्या या जलसेवेचे वितरण आजी- माजी आमदारांच्या हस्ते रेल्वेतील प्रवाशांना करण्यात आले. A commendable initiative has been started through Shree Mahaveer Multi-Purpose Institution.

मराठी नववर्ष गुढी पाडवा आणि नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर आमदार संजय देरकर, माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, ठाणेदार गोपाल उंबरकर, स्टेशन मास्टर प्रेम प्रकाश रंजन यांच्या उपस्थितीत संत्रागाची नांदेड एक्सप्रेस आणि नंदीग्राम एक्सप्रेसच्या प्रवाशांना शुद्ध थंडगार पाण्याचे वाटप प्रत्येक बोगी जवळ करण्यात आले. संबंधित संस्था उन्हाळ्यात वणी रेल्वे स्थानकावरून जाणाऱ्या सर्व प्रवासी गाड्यांमधील प्रवाशांना थंड पिण्याचे पाणी मोफत वितरण करणार आहे.
थंडगार शुद्ध जलसेवेच्या वितरण प्रसंगी महावीर बहुउद्देशीय सेवा संस्थेचे अध्यक्ष अशोक भंडारी, उपाध्यक्ष दीपक छाजेड, सचिव आनंद झामड, पंकज भंडारी, मनोज बोरा, प्रफुल्ल खिंवसरा, चंद्रकुमार चोरडिया, अमोल कोटेचा, जयेश चोरडिया, विनोद बाजोरिया, राजेंद्र खिवसरा, जितेंद्र कोठारी, विवेक गोपणे, रमेश बाजोरिया, नितीन बाफना, जैनम कटारिया, दिलीप कोचेटा, इशान बाफना आणि इतर सेवाभावी कार्यकर्त्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
Rokhthok News






