● अड्डा चालकांवर कारवाई अपेक्षित
Crime News | शहरात ठीक ठिकाणी सुरू असलेल्या मटका अड्यावर पोलीसांनी धाडसत्र अवलंबले आहे. दिपक चौपाटी, एकता नगर, भाजी मंडी परीसरात सुरू असलेल्या मटका अड्यावर धरपकड केली जात आहे. लहानसहान गुर्ग्याना ताब्यात घेत कारवाई करण्यात आली. अड्डा चालवणारे म्होरके मोकाट असल्याने हा निव्वळ कागदोपत्री फार्स तर नाही ना अशी शंका येत असून समूळ उच्चाटन करणे गरजेचे आहे. Raid session on Matka base, 7 arrested.
दिपक चौपाटी परिसरात कोणाचा मटका अड्डा आहे हे सर्वश्रुत असताना तेथे कामगार असलेल्या 3 आरोपींना अटक करण्यात आली. 7 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर एकता नगर परिसरातून दोघांना अटक करण्यात आली. भाजीमंडी परीसरातुन एकाला ताब्यात घेण्यात आले. मटका अड्यावर रोजीने काम करणारे हे रोजमजुर ताब्यात घेऊन कारवाईचा बडेजाव पोलीस प्रशासन करताहेत.

बुधवारी दीपक टॉकीज परीसरातील नगर पालीका कॉम्प्लेक्स मध्ये पोलिसांचे पथक धडकले. धाडसत्रा दरम्यान चांगलीच पळापळ झाली. पोलीसांनी माधव हरीशचंद्र वाढई (37) रा. चिखलगाव, अरूण गंगाधर पामपटटीवार (56) रा. गणेशपुर, चंदु पांडुरंग भासमारे (49) रा.मार्डी ता. मारेगाव, शेख मुराफ शेख मेहबुब (30) रा. रंगनाथनगर यांना घटनास्थळावरून ताब्यात घेतले. मटका पट्टी फडणाऱ्यांना ताब्यात घेत कारवाई केली.
गुरुवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास एकता नगर परीसरात पोलीसांनी धाडसत्र राबवीले. या कारवाईत शेख आमीर शेख मेहबुब (29) रा. एकता नगर तर एका पान टपरीच्या मागे मटका पट्टी फाडणारा शाहरूख खान फिरोज खान (28) रा. रंगनाथ नगर हे पोलिसांना दिसून आले. त्यांना ताब्यात घेण्यात आले. मात्र मुख्य अड्डा चालक आरोपी का नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शहरातील भाजी मंडी परीसरात पोलीसांनी मटका अड्डा शोधून काढत कारवाई केली. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या अड्डयावर केलेल्या कारवाईत मंगेश गुलाब मत्ते (36) रा. रामपुरा वार्ड वणी याला अटक करण्यात आली आहे. शहरात पोलिसांनी मटका अड्डयावर कारवाई करत चांगले काम केले आहे. मात्र जुन्या बसस्थानक परिसरात चालणाऱ्या मटका अड्डयावर कारवाई करण्यात आली नाही याचे आश्चर्य वाटत आहे.
दीपक चौपाटी असो की शाम टॉकीज परिसर, एकता नगर असो को जुने बसस्थानक, पंचशील नगर असो की इंदिरा चौक मटका अड्डा कधीच संपुष्टात येणार नाही. पोलीस प्रशासनाने केलेली कारवाई अजिबात कौतुकास्पद नाही कारण मटका अड्डयाचा खरा मालक मोकाट आहे. रोजमजुरांवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात येत असली तरी समूळ उच्चाटन करण्यासाठी अड्डा चालकांवरच कायद्याचा फास आवळणे गरजेचे झाले आहे.
Rokhthok News






