Home Breaking News रोटरी महोत्सव : प्रमुख आकर्षण अमेझॉन पार्क

रोटरी महोत्सव : प्रमुख आकर्षण अमेझॉन पार्क

● विविध चविष्ठ खाद्य पदार्थाची रेलचेल

C1 20260121

विविध चविष्ठ खाद्य पदार्थाची रेलचेल

Wani News :
रोटरी क्लब ब्लॅक डायमंड सिटी, वणी यांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या रोटरी महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा बहुप्रतिक्षित महोत्सव दि. 21 ते 26 जानेवारी या कालावधीत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात मोठ्या दिमाखात आयोजित करण्यात आला आहे. येथील प्रमुख आकर्षण अमेझॉन पार्क असेल तर विविध चविष्ठ खाद्य पदार्थाची रेलचेल अनुभवता येणार आहे. Rotary Festival: Major attraction Amazon Park

वणी शहरासह परिसरातील नागरिकांसाठी हा महोत्सव खरेदी, मनोरंजन आणि चविष्ट खाद्यपदार्थांची पर्वणी ठरणार आहे. महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरणार आहे भव्य फूड झोन. या फूड झोनमध्ये स्थानिक तसेच बाहेरील भागांतील विविध प्रकारचे चाट पदार्थ, पाणीपुरी, भेळ, डोसा, पंजाबी व चायनीज खाद्यपदार्थ, मिठाई, आईस्क्रीम यांसह अनेक चविष्ट पदार्थ उपलब्ध राहणार आहेत.

IMG 20260511 WA0005

तसेच महोत्सवातील आणखी एक प्रमुख आकर्षण म्हणजे अमेझॉन पार्क. या पार्कमध्ये लहान मुलांपासून तरुणांपर्यंत सर्व वयोगटांसाठी विविध प्रकारचे झुले, राईड्स व मनोरंजनात्मक खेळणी उपलब्ध असणार आहेत. रोमांचक झुले, फिरते झोके आणि आकर्षक राईड्समुळे कुटुंबासह आलेल्या नागरिकांना मनमुराद आनंद लुटता येणार आहे.

Img 20250103 Wa0009

महोत्सवात जनरल स्टॉल, प्रीमियम स्टॉल तसेच विविध प्रकारचे स्टॉल्स उभारण्यात येणार असून, त्यामध्ये घरगुती वापराच्या वस्तू, कपडे, सजावटीच्या वस्तू, दैनंदिन गरजेच्या वस्तू, भेटवस्तू, हस्तकला व इतर अनेक प्रकारच्या वस्तू उपलब्ध असणार आहेत. एकाच ठिकाणी सर्व प्रकारची खरेदी करण्याची सुवर्णसंधी नागरिकांना मिळणार आहे.

सामाजिक बांधिलकी, सेवाभाव, मनोरंजन आणि व्यापार यांचा सुंदर संगम असलेला रोटरी महोत्सव 2026 वणी शहराच्या सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक जीवनात नवी ऊर्जा निर्माण करेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. वणीकर नागरिकांनी कुटुंबासह मोठ्या संख्येने उपस्थित राहून या महोत्सवाचा मनमुराद आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
Rokhthok