● कुटुंबियांवर कोसळला दुःखाचा डोंगर
SAD NEWS | वणी येथील उज्वलकर कुटुंबातील ज्येष्ठ सदस्या तथा मोरेश्वर उज्वलकर यांच्या मातोश्री मंजुळाबाई राघोबाजी उज्वलकर यांचे मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्या मृत्यूसमयी 90 वर्षांच्या होत्या. Sad…Manjulabai Ujwalkar passes away
मातोश्री च्या निधनाने उज्वलकर परिवारावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्या हसतमुख व परिवारातील आनंदी व्यक्तिमत्त्व होत्या. त्यांच्या पश्चात चार मुले, सुना, नातवंडे असा मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्यावर मंगळवारी रात्री 8 वाजता वणी येथील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
( रोखठोक परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली)





