● सच्च्या शिवसैनिकाला न्याय मिळाला
Wani News | यवतमाळ जिल्ह्यातील नवीनतम शिवसेना पदाधिकारी जाहीर करण्यात आले. यात उप जिल्हा प्रमुख संजय निखाडे यांची जिल्हा प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचेकडे वणी व आर्णी विधानसभेचा पदभार देण्यात आला आहे. Sanjay Nikhade was appointed as shivsena District Chief

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने यवतमाळ जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार सामना मध्ये आजच नियुक्ती बाबत बातमी प्रसारित झाली आहे. संजय निखाडे यांनी आपल्या निवडीचे श्रेय खा. संजय देशमुख व आ. संजय देरकर यांना दिले आहे.

संजय निखाडे मागील तीस वर्षांपासून ते एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून परिसरात ओळखल्या जातात. शेतकरी, शेतमजूर, कामगारांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी अनेक आंदोलने केली आहे. व्यसनमुक्ती शिबीर, महा आरोग्य शिबिराचे ते सातत्याने भव्य स्वरूपात आयोजन करतात.
निखाडे यांनी विशेषतः पक्ष संघटन बांधणीकडे लक्ष दिले आहे. त्यांनी सरपंच, पंचायत समिती सदस्य पद भूषवले आहे. त्यातच भाजपच्या त्सुनामीत त्यांनी आपला जिल्हा परिषदेचा गड ढासळू दिला नाही हे विशेष. त्यांच्या निवडीने शिवसैनिकात उत्साह संचारला आहे.
Rokhthok News






