Home Breaking News त्या…. कंपनीला संजय निखाडे यांची ही “Last Warning”

त्या…. कंपनीला संजय निखाडे यांची ही “Last Warning”

● भूमिपुत्र न्यायासाठी पेटला, खाणीत घुसण्याचा इशारा

C1 20250513 12355693

भूमिपुत्र न्यायासाठी पेटला, खाणीत घुसण्याचा इशारा

Wani News : वेकोलीच्या विखुरलेल्या धुळीतून न्यायाच्या वादळाची चाहूल लागली आहे. स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराच्या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने पुकारलेले हल्लाबोल आंदोलन सोमवारी वेकोलीतील माती उत्खनन करणाऱ्या GRN व SIDEX कंपन्यांवर संतापाचा उद्रेक ठरला. This is Sanjay Nikhade’s last warning to that… company.

शिवसेनेचे आ. संजय देरकर यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांच्या नेतृत्वात बेलोरा, निलजई, पुणवट, तरोडा, सुंदरनगर, लाठी बेसा, भालर येथील शेकडो बेरोजगार भूमिपुत्रांनी आंदोलनात सहभाग घेतला. GRN कंपनीच्या गेटसमोर संतप्त जमावाने ठिय्या मांडत “भूमिपुत्रांना रोजगार द्या, अन्यथा खाणी बंद करा” असा दम कंपनी प्रशासनाला दिला.

शिवसैनिकांच्या आक्रमकतेपुढे वेकोली अधिकारी व GRN कंपनीचे प्रतिनिधी मंडपात दाखल झाले. त्यांनी आठ दिवसांच्या आत स्थानिक बेरोजगारांना रोजगार देण्याची स्पष्ट हमी दिली. मात्र, संजय निखाडे यांनी ती अंतिम संधी असल्याचे जाहीर करत, “या आठवड्याच्या शेवटी जर रोजगार दिला नाही, तर पुढच्या सोमवारी कोणतीही पूर्वसूचना न देता आम्ही खाणीत शिरू. मग प्रशासनाला गोळ्या घालाव्या लागल्या तरी आम्ही मागे हटणार नाही,” असा इशारा दिला.

Img 20250103 Wa0009

यावेळी शरद ठाकरे, सुधीर थेरे, राजू तुराणकर, डॉ. बोबडे, लुकेश्वर बोबडे, प्रशांत पाचभाई, विनोद ढुमणे, आनंद घोटेकर, संजय देठे, अभय चौधरी, तुळशीराम मस्की, करण किंगरे, दिवाकर भोंगळे, सतीश वऱ्हाटे, शत्रुघ्न मालेकर, महेश सोमलकर, पुरुषोत्तम बुत्ते, संभा मते, रवी पोटे, सोमेश्वर गेडेकर, थेरे पाटील,स्मिता घनश्याम गोवारदिपे उपसरपंच ग्रामपंचायत तरोडा, वैष्णवी सतीश वऱ्हाटे माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य व स्थानिकांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती.

भूमिपुत्रांचा आवाज आता थांबणार नाही

हळूहळू पेटलेला हा लढा आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. रोजगार मिळेपर्यंत हा लढा थांबणार नाही. प्रशासनाने आणि संबंधित कंपन्यांनी जर वेळेत योग्य निर्णय घेतला नाही, तर येत्या आठवड्यात वेकोलीच्या खाणींमध्ये आणखी मोठा संघर्ष उसळण्याची शक्यता नाकारता येत नाही
संजय निखाडे
जिल्हा प्रमुख,
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
Rokhthok News