Home Breaking News त्या…अधिकाऱ्याला निलंबित करा, विजय चोरडिया आक्रमक

त्या…अधिकाऱ्याला निलंबित करा, विजय चोरडिया आक्रमक

● कोट्यवधी रुपयांच्या अवैध रेतीचा उपसा ● शासनाच्या तिजोरीला मोठा आर्थिक फटका

C1 20260208
कोट्यवधी रुपयांच्या अवैध रेतीचा उपसा !
शासनाच्या तिजोरीला मोठा आर्थिक फटका

WANI NEWS :
वणी तालुक्यातील बेलोरा घाट येथे सुरू असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या अवैध रेती उपशामुळे शासनाच्या तिजोरीला मोठा आर्थिक फटका बसत आहे. यास सर्वस्वी जबाबदार असलेले वणीचे तहसीलदार व मंडळ अधिकारी राठोड यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी, अशी “रोखठोक” मागणी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे शिवसेना जिल्हा संघटक विजय चोरडिया यांनी केली आहे. Suspend that officer, Vijay Chordia is aggressive.

निवेदनात नमूद आहे की, बेलोरा घाट हा सध्या रेती तस्करांचा अड्डा बनला आहे, पोकलेन मशीनच्या सहाय्याने दिवसाढवळ्या व रात्री मोठ्या प्रमाणावर अवैध उपसा करण्यात येत आहे. यामुळे शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. या प्रकरणात संबंधित महसूल अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद दिसत असून, मंडळ अधिकारी यांनी जाणीवपूर्वक डोळेझाक केल्याचा आरोप सुध्दा निवेदनातून करण्यात आला आहे.

IMG 20260511 WA0005

महसूल विभागाने रेती तस्करांशी आर्थिक साटेलोटे करून मुकसंमती दिल्याचा गंभीर आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. तसेच, तहसीलदार यांना वारंवार माहिती देऊनही त्यांनी घटनास्थळी भेट न देता वेळकाढूपणा केल्याने रेती तस्करीला अप्रत्यक्ष संरक्षण मिळाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घाटामुळे घरकुल लाभार्थ्यांना नियमानुसार रेती मिळाली नसल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Img 20250103 Wa0009

बेलोरा घाटाला “सोन्याचे अंडे देणारी कोंबडी” बनवण्यात संबंधित अधिकाऱ्यांचा हात असल्याचा आरोप करत, बेलोरा घाट तात्काळ बंद करण्यात यावा. रेती उत्खननाचे मूल्यांकन करून किती रेती चोरी झाली याचा खुलासा करावा. रेती चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करून तहसीलदार व मंडळ अधिकारी या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

या प्रकरणात तात्काळ ठोस निर्णय न झाल्यास तहसील कार्यालयासमोर शिवसेना स्टाईल आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. आंदोलनातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीस प्रशासन जबाबदार राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनाची प्रत पालकमंत्री संजय राठोड यांचेसह प्रमुख अधिकाऱ्यांना पाठविण्यात आली आहे.
ROKHTHOK

( छायाचित्र परिणामकारक व्हावं याकरिता AI चा वापर करण्यात आला आहे )

Previous articleमैत्रीच्या नात्याला काळाचं बंधन नसतं…!
Next articleDrugs Crime : कोण आहेत ते ‘व्हाईट कॉलर’…!
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.