● नायरा पेट्रोल पंपाजवळील घटना
Wani News :
भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात कारचा अक्षरशः चुराडा झाल्याची घटना नायरा पेट्रोल पंपाजवळ घडली. या अपघातात वाहन चालवत असलेले शिक्षक जखमी झाल्याची माहिती असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना रविवारी रात्री 10:30 वाजताच्या दरम्यान घडली.Teacher injured in horrific speeding car accident
वासेकर लेआऊट येथील रहिवासी असलेले शिक्षक विलास टोंगे हे आपल्या कार क्रमांक MH-29-BC-0829 ने मुकुटबनकडे जात असताना नायरा पेट्रोल पंपाजवळ अचानक वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर कार रस्त्याच्या कडेला फेकली गेली. अपघात इतका भीषण होता की वाहनाचा पूर्णपणे चुराडा झाला.

अपघातग्रस्त कारमध्ये एकूण किती जण प्रवास करत होते याबाबत स्पष्ठता नाही, मात्र या भीषण अपघातात शिक्षक टोंगे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र त्यांच्या सोबत नेमके कोण होते, याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. या अपघातामुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती.
Rokhthok






