● शिंदोला पोलीस चौकी समोरील घटना
Sad News | शिंदोला परिसरातून अवजड वाहनांची मोठी वर्दळ असते तर भरधाव वेगाने वाहने हकण्यात येतात. शुक्रवारी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान आपल्या बकऱ्या साठी चार आणायला जात असलेल्या 52 वर्षीय दुचकीस्वाराला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. A 52-year-old bike rider was hit by an unknown vehicle and died on the spot.
सुनील निब्रड (52) असे मृतक दुचाकीस्वाराचे नाव आहे. ते आपल्या परिवारासह शिंदोला येथे वास्तव्यास होते. घटनेच्या दिवशी ते चारा आणायला जात असताना भरधाव वाहनाने दुचाकीला उडवले. या घटनेत त्यांना जबर मर लागला, मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. नागरिकांनी पोलिसांना कळवले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह रुग्णालयात हलविण्यात आला. पुढील तपास शिरपूर पोलीस करताहेत.
Rokhthok News





