● काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत प्रतिभा धानोरकरांचे नाव नाही
सुनील पाटील, वणी : काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यात विदर्भातील नागपूर,भंडारा,गडचिरोली आणि रामटेक येथील चार लोकसभा उमेदवारांची घोषणा केली आहे. मात्र चंद्रपूर लोकसभेचा तिढा अद्याप कायम असून विजय वडेट्टीवार आग्रही आहेत. काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत प्रतिभा धानोरकरांचे नाव नसल्याने समर्थक मात्र संभ्रमात आहे. Pratibha Dhanorkar’s name is not in the second list of Congress, so the supporters are confused
चंद्रपुर -वणी -आर्णी लोकसभा निवडणुकी करीता महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल या बाबत अनेक तर्क वितर्क लढवले जात आहे. काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार बाळु धानोरकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले होते. यामुळे त्यांच्या अर्धांगिनी आ. प्रतिभा धानोरकर यांनाच लोकसभेची उमेदवारी मिळेल असे वाटत असतानाच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उमेदवारी साठी दावा केला.

कॉग्रेस पक्षातील अंतर्गत कलह बघता उमेदवारी जाहीर होई पर्यंत कोणताही निष्कर्ष काढणे कठीण आहे. तर भारतीय जनता पक्षाने माञ मागील निवडणुकीत पराभुत झालेल्या माजी केंद्रीय राज्यमंञी हंसराज अहिर यांचा पत्ता कट करुन राज्यातील वनमंञी सुधीर मुनगंटीवार यांना निवडणुकीच्या रनसंग्रामात उतरवले आहे. भाजपने तगडा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवला असून काँग्रेसला निवडणूक जिंकायची असेल तर तुल्यबळ उमेदवार द्यावा लागणार आहे.
Rokhthok News






