● आणि.. भरधाव ट्रकने दुचाकीला उडवले
Sad News :
वणी-मुकुटबन मार्गावर शनिवारी सायंकाळी 5:30 वाजता चेंडकापूरजवळ भरधाव ट्रकने दुचाकीला जबर धडक दिली. यात एका 25 वर्षीय तरुणांचा मृत्यू झाला तर सोबत प्रवास करणारी तरुणी व तरुण गंभीर जखमी झाले आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली. Very unfortunate! One killed, two seriously injured in accident
प्रफुल संजय गागरे (25) रा. पिंप्रड तालुका झरी जामनी असे दुचाकीस्वार मृतक तरुणाचे नाव आहे. त्याच्यासोबत दुचाकीवर मागे बसलेले सुजल भोयर (20) व त्याची बहीण आंचल भोयर (18) ही गंभीर जखमी झाले आहेत. हे तिघे दुचाकी क्रमांक MH-29-CL -1324 ने वणीतील काम आटोपून आपल्या गावी परतत होते.

भाजपला जबर धक्का! उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत भव्य पक्षप्रवेश
चेंडकापूर गावाजवळील एका वळणावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रक क्रमांक (MH 34 BG 8277) ने दुचाकीला जबर धडक दिली. धडकेनंतर तिघेही रस्त्यावर फेकले गेले. घटना घडताच स्थानिक नागरिक व प्रत्यक्षदर्शीनी पोलिसांना सूचित केले. जखमींना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.
या घटनेत प्रफुलच्या डोक्याला, छातीला आणि पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्याला वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. सुजल आणि आंचल दोघांनाही गंभीर अवस्थेत वणीतील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या दुर्घटनेने परिसरात खळबळ उडाली असून रस्त्यावरील बेजबाबदार वाहतुकीला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे. याप्रकरणी शिरपूर पोलीस तपास करत आहे.
ROKHTHOK






