● आरोपीला अवघ्या काही तासांतच अटक
Crime News : मारेगाव तालुक्यातील आपटी येथे जुन्या वादातून एका मजुरावर काठीने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना शनिवारी दिनांक 11 जुलैला दुपारी घडली. या प्रकरणी मारेगाव पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अवघ्या काही तासांतच अटक करण्यात आली आहे. Crime ..Attacked with a stick, man seriously injured
प्राप्त माहितीनुसार, पुंडलीक घनश्याम ठमके (45) हे आपटी येथील निवासी आहे. ते शनिवारी दुपारी शेताकडे जात असताना आरोपी नंदु उर्फ नंदलाल माधव आत्राम (55) राहणार आपटी याने त्यांना अडवून शिवीगाळ केली. यानंतर घरासमोरील काठी उचलून त्यांच्या डोक्यावर, दोन्ही हातांवर व पायांवर हल्ला करत गंभीर दुखापत केली.
फिर्यादी व आरोपी यांच्यात मागील काही महिन्यांपासून वाद सुरू असून यासंदर्भात न्यायालयातही खटला प्रलंबित असल्याची माहिती पोलिसांनी दिली. जुन्या वैमनस्यातूनच हा हल्ला झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
जखमी पुंडलीक ठमके यांच्या तक्रारीवरून मारेगाव पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 118(2) व 296 अन्वये गुन्हा दाखल केला. घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी नंदु आत्राम याला अटक केली.
दरम्यान, जखमीची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालय, चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. सदर प्रकरणाचा तपास API सागर दानडे यांच्या मार्गदर्शनाखाली API रवी बुरकुले, सहायक फौजदार दिगंबर किनाके व पोलीस शिपाई प्रवीण वारंजे करीत आहेत.
ROKHTHOK






