Home क्राईम Crime : दोन खंडणी बहाद्दर पोलिसांच्या ताब्यात

Crime : दोन खंडणी बहाद्दर पोलिसांच्या ताब्यात

● चाकू मारण्याची दिली होती धमकी

1648
C1 20231023 08061914

चाकू मारण्याची दिली होती धमकी

Wani crime News | शहरातील मुख्य चौकातून दोन तरुणांनी एकाला दुचाकीवर जबरदस्तीने बसवले. शाळेच्या मागील बाजूस नेत त्याला मारहाण करत पैशाची मागणी करण्यात आली. तक्रारीअंती याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद करत दोघांना ताब्यात घेतले आहे. The police registered a case and detained both.

Img 20250601 wa0036

सण उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता पोलीस प्रशासन सतर्क असतात. त्यातच काही भामटे कायदा हातात घेत असल्याचे दिसून येत आहे. शहरात गुन्हेगारी प्रवृत्तीची वाढ तर होत नाही ना अशी शंका बळावत चालली आहे.

Img 20250103 Wa0009

युवी मोगरे (24), साहील मुने (25) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेच्या दिवशी या दोघांनी एकाला जबरदस्तीने गाडीवर बसवले. शाळेच्यामागे अंधारात नेले व हात बुक्यानी मारहाण केली. तात्काळ तीन हजार रुपयांची मागणी करत उर्वरित सात हजार दुसऱ्या दिवशी दे नाहीतर चाकूने मारण्यात येईल अशी धमकी देत अश्लिल भाषेत शिवीगाळ केल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे.

फिर्यादी सुषमा विजय वाघमारे यांनी पोलिसात धाव घेत रीतसर तक्रार दाखल केली. तक्रारीत मुलासोबत घडलेली घटना नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी भादवि कलम 143, 147, 149, 294, 386 नुसार गुन्हा नोंद केला आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. पवन बंसोड, अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, sdpo गणेश किंद्रे, ठाणेदार अजित जाधव यांचे मार्गदर्शनात डी.बी.पथकचे API माधव शिंदे, सुदर्शन वानोळे, विशाल गेडाम, गजानन कुडमेथे यांनी केली, पुढील तपास API दत्ता पेंडकर हे करीत आहे.
ROKHTHOK NEWS