● चार महिला ताब्यात, एक ग्राहक अडकला
Crime News : शहरातील प्रतिष्ठित कॉलनीत देहविक्री होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. सापळा रचला, खोटा ग्राहक पाठवून खातरजमा केली आणि चार महिला सह एक ग्राहक जाळ्यात अडकला. ही घटना यवतमाळ शहरातील पॉश कॉलनीत नुकतीच उघडकीस आली. The police received confidential information that prostitution was going on in a prestigious colony in the city.
“देहविक्री” शब्द अतिरेकी वाटत असला तरी आंबट शौकीन आपली वासना तृप्त करण्यासाठी कुठेही येतो याचा प्रत्यय सातत्याने उजागर होतोय. शहरातील बांगर नगर (गेडाम नगर) परिसरात भाडेतत्वावर घेतलेल्या घरात काही महिला देहविक्री करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.

पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून धाडसत्र अवलंबले. यावेळी कुंटनखाना चालवणाऱ्या दोन महिला व देहविक्री करणाऱ्या दोघींना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्या प्रमाणेच एक ग्राहक सुद्धा यावेळी घटनास्थळी आढळून आला. त्यांची अंग झडती घेतली असता त्यांचेकडे वेश्या व्यवसाया करीता लागणारे साहित्य मिळून आले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उप विभागीय पोलीस अधिकारी दिनेश वैसाने यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार पोलीस निरीक्षक रामकृष्ण जाधव, सपोनि विकास दांडे, रावसाहेब शेंडे, प्रदीप नाईकवाडे, गौरव ठाकरे, अभिषेक वानखेडे, पवन नांदेकर, रोहीणी वाकोडे, प्रदीप कुराडकर, चालक नितीन पंचबुध्दे यांनी केली.
Rokhthok News






