● तीन वेळा भुषवले उपाध्यक्ष पद
Wani News | संपुर्ण राज्यात कार्यक्षेञ असलेल्या तसेच 37 शाखांचा कार्यविस्तार यशस्वीरित्या उतुंग शिखरावर पोहचविणाऱ्या पुसद अर्बन कॉ ऑप. बँकेची 2023- 2028 कार्यकाळासाठी संचालक मंडळाची निवडणुक नुकतीच अविरोध पार पडली. संचालकपदी पाचव्यांदा स्थानापन्न होण्याचा मान राकेश ओमप्रकाश खुराणा यांना मिळाला आहे. त्यांनी तीन वेळा यशस्वीरित्या उपाध्यक्ष पद उपभोगले आहे. पुन्हा त्यांची वर्णी लागणार का हे बघणे औत्सूक्याचे ठरणार आहे. Rakesh Omprakash Khurana has got the honor of being promoted to the post of director for the fifth time.
राकेश खुराणा हे वणी विधानसभा मतदारसंघातील सामाजिक क्षेञात तडफेने कार्य करणारे नेतृत्व आहे. ते वणी शहराचे माजी नगराध्यक्ष होते, विविध संघटनेच्या माध्यमातुन जनहितार्थ उपक्रम सातत्याने राबवत असतात. सध्यस्थितीत व्यापारी असोशिएशनचे ते अध्यक्ष आहेत. युवा क्रांती संघटनेच्या माध्यमातुन त्यांनी अनेक महत्वपुर्ण प्रश्नाला वाचा फोडली आहे तर सामाजिक प्रश्न हाताळण्यात ते अग्रेसर असतात.

ऍड अप्पाराव उपाख्य नाना मैंद यांनी लावलेल्या रोपट्याचे रुपांतर वटवृक्षात झाले आहे. ही सर्व किमया बँकेचे कुशल अध्यक्ष शरद मैंद यांनी लिलया पार पाडली आहे. जुलै 2002 मध्ये अध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आपल्या सहकारी संचालकांना विश्वासात घेत त्यांनी बँकेचा कार्यविस्तार संपूर्ण महराष्ट्रात वाढवला आहे.
बॅकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळानी समन्वय ठेवत ग्राहकांना बँकिंग क्षेत्राशी निगडित आधुनिक सोयी सुविधा दिल्या. बॅकेने सामाजिक उपक्रमाअंतर्गत विविध कामे करून प्रशासनाला देखील सहकार्य केले आहे. त्यांच्याच नेतृत्वात सलग तिसऱ्यांदा बँकेची संचालक मंडळाची निवडणुक अविरोध झाली आहे.
नवनिर्वाचित संचालंकामध्ये वैयक्तिक मतदारसंघातून विद्यमान अध्यक्ष शरद आप्पाराव मैंद, तसेच संचालक ललीत हिम्मतलाल सेता, निळकंठ गोविंदराव पाटील, बाळासाहेब जयवंतराव पाटील, के. आय. मिर्झा, प्रवीर प्रकाश व्यवहारे, विनायक गुरुनाथ डुबेवार (रा. सर्व पुसद), 25 किमी बाहेरील वैयक्तिक मतदारसंघातून विद्यमान उपाध्यक्ष राकेश ओमप्रकाश खुराणा (वणी), अविनाश नंदकिशोर अग्रवाल (उमरखेड), अतुल पांडुरंगराव पावडे (नांदेड), महिला राखीव मतदारसंघातून राजश्री सुधीरराव देशमुख दिग्रस, वंदना शरद पाटील (पुसद), वि. जा. भ. ज. वि. मा. प्र. मतदार संघ सुनील दयाराम चव्हाण (पुसद), ई. मा. प्र. निरंजन खुशालराव मानकर (यवतमाळ) अ.जा. अ.ज. मतदारसंघ रंजित धर्मिदास सांबरे (पुसद) यांचा समावेश आहे.
Rokhthok News






