Home राजकीय भाजपा तालुकाध्यक्षपदी पुन्‍हा “गजानन विधाते”

भाजपा तालुकाध्यक्षपदी पुन्‍हा “गजानन विधाते”

● पक्षश्रेष्ठींनी दाखवला विश्‍वास

430
C1 20231231 13475217

पक्षश्रेष्ठींनी दाखवला विश्‍वास

Bjp News Wani : भारतीय जनता पक्षाने तालुकास्तरीय पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. पक्षहीत जोपासणारे व संघटना बांधणी करणाऱ्यांना या निवडीत स्थान देण्यात आले आहे. येथील भारतीय जनता पार्टीचे सक्रिय कार्यकर्ते गजानन विधाते यांनी मागील तीन वर्षांच्या कार्यकाळात अतिशय चांगले काम केल्यामुळे त्यांची तालुका अध्यक्षपदी पुन्हा निवड करण्यात आली आहे. Gajanan Viddate has been re-elected as Taluka President.

Img 20250619 wa0016

गजानन विधाते हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे पासून विद्यार्थी जीवनात तसेच सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यानंतर त्यांनी भारतीय जनता युवा मोर्चा मध्ये 2003 पासून शहर सरचिटणीस,  तालुका अध्यक्ष म्हणून दोन कार्यकाळात काम केल्यानंतर त्यांना भाजपाचे वणी तालुका सरचिटणीस म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती.

Img 20250103 Wa0009

गजानन विधाते हे मागील तीन वर्षापासुन भाजपाचे तालुका अध्यक्ष आहेत. त्‍यांनी पक्ष श्रेष्ठीनी टाकलेली जबाबदारी सार्थ ठरवित मागील तीन वर्षांमध्ये तालुक्यातील सहकार क्षेत्र,  ग्रामपंचायत व इतर निवडणुकीत पक्षाला विजयी करण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे.

त्‍यांनी आपल्‍या निवडीचे श्रेय केंद्रीय मागास आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, भाजपाचे जिल्हा अध्यक्ष तारेंद्र बोर्डे तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्‍यांना दिले आहे. पक्षश्रेष्‍ठींनी  गजानन विधाते यांच्यावर विश्वास दाखवून तालुक्यातील नेतृत्व करण्यासाठी तालुका अध्यक्ष पदाची माळ पुन्हा एकदा त्यांच्या गळ्यात टाकून मोठा विश्वास दाखविला आहे. त्यांच्या या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
Rokhthok News