Home राजकीय आणि….. अखेर सरकार झुकले, आ. देरकरांच्या पाठपुराव्याला यश..!

आणि….. अखेर सरकार झुकले, आ. देरकरांच्या पाठपुराव्याला यश..!

● जिल्ह्यातील सर्व तालुके दुष्काळी उपाययोजनेच्या कक्षेत.....

C1 20260926

● जिल्ह्यातील सर्व तालुके दुष्काळी उपाययोजनेच्या कक्षेत…..

POLITICAL NEWS :
Shiv Sena’s agitation and government collapsed, A. Derkar’s pursuit was successful..! पावसाच्या दडीमुळे खरीप पिके संकटात सापडलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय अखेर राज्य शासनाने घेतला आहे. आमदार संजय देरकर यांनी शेतकरी हितार्थ अनेकदा आंदोलनात्मक पवित्रा घेतला होता. बळीराजा संतप्त, आक्रमक होत असल्याचे लक्षात येताच अखेर सरकार झुकले असून यवतमाळ जिल्ह्यातील सर्वच तालुके दुष्काळी उपाययोजनेच्या कक्षेत आल्याने शेतकऱ्यांना या उपाययोजनांचा लाभ मिळणार आहे.

खरीप हंगाम 2026 मध्ये Trigger-1 लागू झालेल्या राज्यातील 265 तालुक्यांसाठी दुष्काळी उपाययोजना व विविध सवलती लागू करण्यात आल्या असून, यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील सर्व 16 तालुक्यांचा समावेश आहे. शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती आणि पिकांचे नुकसान लक्षात घेऊन आ. संजय देरकर यांनी शासनाकडे सातत्याने पत्रव्यवहार व पाठपुरावा केला होता, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन दुष्काळी उपाययोजना लागू करण्याची मागणी केली होती.

शासन निर्णयानुसार दुष्काळी भागात जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी संबंधित कर्जवसुलीस स्थगिती आणि कृषी पंपांच्या चालू वीजबिलात सवलत देण्याची तरतूद आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोजगार हमीच्या कामांसाठी निकषांमध्ये शिथिलता, गरजेनुसार टँकरने पाणीपुरवठा, अन्नधान्याची व्यवस्था, जनावरांसाठी चारा-पाणी आणि जलसंधारणाची कामे सुरू करण्याच्या उपाययोजनांचाही समावेश आहे.

Img 20250103 Wa0009

टंचाईग्रस्त गावांमध्ये शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची वीज जोडणी खंडित न करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकरी आणि शेतमजुरांना तातडीचा दिलासा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना पंचनाम्याची कार्यवाही तातडीने सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सर्वेक्षण केलेल्या क्षेत्रातील पिकांची स्थिती दर्शविणारी छायाचित्रे व GPS को-ऑर्डिनेट्स संकलित करून अहवाल शासनाकडे सादर केला जाणार आहे.

मात्र पीक नुकसानीची प्रत्यक्ष आर्थिक मदत स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे निश्चित होणार आहे. त्यामुळे दुष्काळी सवलती जाहीर झाल्यानंतर आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आर्थिक मदत कधी मिळते, याकडे लक्ष लागले आहे.

“हा शेतकऱ्यांच्या संघर्षाचा पहिला विजय”

“वणी, मारेगाव आणि झरी-जामणीतील शेतकरी अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहेत. पिके करपताना आम्ही स्वस्थ बसू शकत नव्हतो. त्यामुळे शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला, मुख्यमंत्र्यांना परिस्थितीची माहिती दिली आणि शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षानेही रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांचा आवाज बुलंद केला. दुष्काळी उपाययोजना लागू करण्याचा निर्णय हा संघर्षातील महत्त्वाचा टप्पा आहे.
आ. संजय देरकर
वणी विधानसभा

शासनाने केवळ घोषणा आणि सवलती करू नये अन्यथा.. प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्याला प्रत्यक्ष आर्थिक मदत मिळेपर्यंत पाठपुरावा सुरूच राहील. पंचनामे तातडीने, पारदर्शकपणे पूर्ण करून मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात लवकर जमा झाली पाहिजे,” अशी भूमिका आ. संजय देरकर यांनी घेतली आहे.
ROKHTHOK