Home सामाजिक तिरळी कुणबी संघटनेच्या अध्यक्षपदी देवडे तर सचिव चौधरी

तिरळी कुणबी संघटनेच्या अध्यक्षपदी देवडे तर सचिव चौधरी

376

खंडोबा-वाघोबा सभागृहात समाज बांधवाचा सहभाग…

वणीः तिरळी कुणबी तालुका कार्यकारणीची सर्वसाधारण सभा शनिवार दि. 8 आक्‍टोबरला शहरातील खंडोबा-वाघोबा सभागृहात पार पडली. आयोजीत सभेत तालुक्यातील शेकडो समाज बांधवानी सहभाग नोंदविला होता. याप्रसंगी सर्वानुमते तिरळी कुणबी संघटनेच्या अध्यक्षपदी कार्तिक देवडे तर सचिवपदी निलेश चौधरी यांची निवड करण्‍यात आली.

Img 20250619 wa0016

आयोजीत सर्वसाधारण सभेत रामराव काळे यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती. कार्यक्रमांच्‍या अध्‍यक्षस्‍थानी डॉ. शांताराम ठाकरे तर प्रमुख पाहुणे म्‍हणुन प्रविण इंगोले, अशोक चं.चौधरी, अशोक ब.चौधरी हे होते. मान्‍यवरांनी संघटनेच्या सुरुवातीपासून, रोपट्याचे वटवृक्ष कसे झाले, यासंदर्भात माहीती दिली.

Img 20250103 Wa0009

आयोजीत सर्वसाधारण सभेत तिरळी कुणबी संघटनेची जुनी कार्यकारणी बरखास्त करण्‍यात आली तर नवीन कार्यकारणी मध्ये अध्यक्षपदी कार्तीक देवडे तर सचिवपदी निलेश अ. चौधरी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी सदस्य म्हणुन ज्योती ढाले, राहुल इंगोले, आशिष काळे, प्रशांत गोमकर, प्रफुल चौधरी, शुभम इंगळेसह महीलांचा सहभाग होता.

सभेला शरद इंगळे, प्रशांत गोडे, संजय साखरकर, संतोष भेले, सुचित्राताई गोडे, राजु साखरकर, शुभम इंगळे, प्रसाद ढालेसह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमांच्‍या सुरवातीला ले. कर्नल वासुदेव आवारी यांना श्रध्‍दांजली वाहण्‍यात आली. प्रास्‍तावीक करतांना अशोक चं.चौधरी यांनी त्यांच्या कार्यकाळातील अनुभव विषद केले. संघटनेमध्ये आलेल्या अडचणी यांनी प्रास्ताविकात मांडल्या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुनील गोडे यांनी तर आभार राजु देवडे यांनी मानले.
वणीः बातमीदार