Home वणी परिसर अबे पोट्टे हो.. कराळे मास्तर येत हाय ना वणी ले..!

अबे पोट्टे हो.. कराळे मास्तर येत हाय ना वणी ले..!

3108

चला त मंग शेतकरी मंदिरात..

आपल्या अस्सल वऱ्हाडी भाषेतून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे व अन्य विषयावर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करणारे वर्धा येथील प्रा. नितेश कराळे रविवार दि 10 ऑक्टोबर ला वणी येथे येणार आहेत. अल्पावधीत लोकप्रिय झालेले व्यक्तिमत्त्व आणि विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेचा वापर करतात. ये डोंबड्या..लक्ष दे…येतं की नाही…मंग..शेतकरी मंदिरात…!

Img 20250601 wa0036

कोरोना काळात सर्व जग थांबले होते. व्यवसाय, नोकरी, शिक्षण बंद झाले होते. मात्र सुरू होता तो मोबाईल आणि याच मोबाईल च्या माध्यमातून अनेकांनी आपल्यातील सुप्त गुण जगा समोर आणले आहे. आपल्या खास वऱ्हाडी शैलीत एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना शिकवत विदर्भ व महाराष्ट्रात तरुणाईमध्ये “खद खद सर” म्हणून ओळखले जाणारे नितेश कराळे वणीतील तरुणांना मार्गदर्शन करणार आहेत.

Img 20250103 Wa0009

वर्धा येथील फिनिक्स अकॅडमीचे संचालक प्रा. नितेश कराळे टाळेबंदी च्या काळात शिकवणी वर्ग बंद ठेवण्यात आले होते. याचा फटका शिकवणी वर्गांना बसला. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देता येईल का हा विचार करून प्रा.कराळे यांनी एक व्हिडिओ तयार करून यु ट्यूब वर लोड केला. त्यांनी अस्सल वऱ्हाडी भाषेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि रातोरात ते प्रकाश झोतात आले.

अनेक विषय घेऊन ते ऑनलाईन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असतात. अतिशय सोप्या आणि सहज भाषेत ते समजावून सांगतात. त्यामुळे ते विद्यार्थ्यां मध्ये लोकप्रिय होत चालले आहे. आता 10 ऑक्टोबर ला वणी येथील शेतकरी मंदिरात येणार आहे. दुपारी 12 वाजता ओबीसी जनगणना का व्हावी,  स्पर्धा परीक्षा व करियर गाईडन्स मार्गदर्शन करण्याकरिता येणार आहे. सोबतच स्टुडंट राईट असो ऑफ इंडिया चे अध्यक्ष उमेश कोराम हे देखील उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे…..त मंग येता न शेतकरी मंदिरात “फद फद लावा रस कसा पडते” ते आयकाले…रविवारी…

वणी: बातमीदार