Home वणी परिसर अलफोर्स स्वर्णलिला शाळेचे नविन सत्र उत्साहात सुरु

अलफोर्स स्वर्णलिला शाळेचे नविन सत्र उत्साहात सुरु

180

पहिल्याच दिवशी विविध कार्यक्रमाचे आयोजन

वणीः शहरातील प्रतिथयश अलफोर्स स्वर्णलिला इंटरनॅशनल शाळेचे नविन सत्र दि. 24 जुन पासुन धडाक्यात सुरु करण्यात आले. विद्यार्थ्यांना शालेय वातावरणामध्ये एकरुप होता यावं याकरीता तिन ते चार दिवसापुर्वीच शाळा सुरु करण्यात आली.

Img 20250601 wa0036

शाळेच्या पहिल्याच दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांचे आरोग्य, त्यांची शैक्षणिक व सामाजीक प्रगती तसेच शाळेचे शिस्तबध्द वातावरण यासाठी हवनयुक्त प्रार्थना करण्यात आली. याप्रसंगी शाळेचे संचालक डॉ नरेंद्र रेड्डी उपस्थित होते.

Img 20250103 Wa0009

शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करून बक्षीस वितरण करण्यात आले. राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धा विजेता शिवम केशवाणी व राष्ट्रीय नृत्य स्पर्धा विजेती सांज तेलंग तसेच युनिफाईड काउन्सील ऑफ ऑल्मपियाड विजेता स्पर्धकांचे प्रशस्तीपत्रक व पदक संचालक डॉ नरेंद्र रेडडी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

आयोजित कार्यक्रमात संचालक डॉ नरेंद्र रेड्डी व प्राचार्या सौजन्या मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
वणीः बातमीदार