Home वणी परिसर नागरिकांनो सावधान….वणी “डेंजरझोन” मध्ये..!

नागरिकांनो सावधान….वणी “डेंजरझोन” मध्ये..!

986

प्रदूषण कमालीचे वाढले,
एअर क्वालिटी इंडेक्स 150 च्या वर

वणी: प्रदूषण नियंत्रण मंडळ देशातील मेट्रो शहरे आणि औद्योगिक शहरात सतत हवा गुणवत्ता तपासत असते. मात्र तालुकास्तरावर ती यंत्रणा नाही परंतू उपग्रहाद्वारे मोजण्यात येणारे Air quality endex दीडशेच्या वर असल्याने मानवी आरोग्यावर परिणाम करणारे आहे.

Img 20250601 wa0036

वणीकर नागरिकांनो सावधान.. परिसरातील प्रदूषण कमालीचे वाढले आहे. उप विभाग औद्योगिक क्षेत्र म्हणून ओळखल्या जाते. कोळसा खाणी, त्यावर आधारित व्यवसाय, खनिजाचे दळणवळण प्रदूषणवाढीला कारणीभूत ठरत आहे.

Img 20250103 Wa0009

वणी शहरातील रेल्वे सायडिंग, कोलडेपो आणि कोळसा वाहतुकदारांच्या बेलगाम वर्तनामुळे वायू प्रदूषण होत असल्याचे वास्तव नाकारता येत नाही. त्यातच विकासात्मक कामे, औद्योगिकीकरण यामुळे होत असलेला पर्यावरणाचा ऱ्हास शहराला “डेंजरझोन” मध्ये आपसूकच ढकलत आहे.

वणी तालुक्यातील कोळसा, सिमेंट दगड खाणी, चुनाभीट्टी, ढोलामाईट, डांबर प्लॉन्ट, गिट्टी क्रेशर, कोल वॉशरी इत्यादी उद्योगामध्ये दिवसरात्र चालणारे उत्खनन, साठवणुक माल चढविणे उतरविणे, ट्रॅकव्दारे कोळसा, सिमेंट दगड, गिट्टी चुरी ट्रार्पोलीन झाकुन नियमानुसार वाहतुक होत नाही. परिणामी वातावरणात हवेतील धूळ साचून प्रदूषणात वाढ होत आहे.
वणी: बातमीदार

एअर क्वालिटी इंडेक्स धोकादायक पातळीवर
काही वर्षांपूर्वी निरी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने वणी शहरातील प्रदूषणाबाबत कृती आराखडा तयार केला होता. परिसर प्रदूषित असल्याचा ठपका ठेवण्यात आलेला असतांना हवेची गुणवत्ता तपासणी यंत्रणा कार्यान्वित करणे गरजेचे आहे. यवतमाळ जिल्हातील Air quality endex दिडशेच्या वर असून आरोग्यविषयक समस्या निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे.
प्रा. सुरेश चोपणे
सदस्य,
केंद्रीय वने, पर्यावरण आणि हवामान बदल, मंत्रालय