Home वणी परिसर मारेगावात भरला रानमेवा महोत्सव

मारेगावात भरला रानमेवा महोत्सव

523

मारेगाव: दीपक डोहणे-जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून मारेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात उमेद बचत गटाचे वतीने बुधवारला रानमेवा महोत्सव आयोजित करण्यात आला.

Img 20250601 wa0036

रानभाज्यांचे महत्त्व लोकांपर्यंत पोहचविणे त्यातून आदिवासी शेतकऱ्यांना उत्पन्नाचे स्रोत निर्माण व्हावे या करिता महाराष्ट्र शासनामार्फत रानभाजी महोत्सव साजरा करण्यात येत आहे.

Img 20250103 Wa0009

रानभाजी, पावसाच्या प्रारंभी सर्वत्र आढळून येत असून औषधी गुणधर्माने परिपूर्ण असल्याने आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त असतात. या राणभाज्यांचे नियमित सेवन केल्यास विविध आजारासाठी हितकारक असल्याची भूमिका विषद करण्यात आली. रानमेवा महोत्सवाचे उद्घाटन पं. स.सभापती शीतल पोटे यांनी केले. शंकर लालसरे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा कृषी अधीक्षक तथा तालुका कृषी अधिकारी पारसकर यांचे मार्गदर्शनात हा महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी बहुसंख्य शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

Previous articleभाकप चे धरणे आंदोलन व निदर्शने
Next articleझरी जामणी आय.टी.आय. मध्ये भरती मेळावा
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.