Home वणी परिसर यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेची 75 टक्के वसुली

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेची 75 टक्के वसुली

322

सोसायटीच्या सदस्यांचा सन्मान सोहळा

वणी:-  सण 2020-2021 वर्षातील कर्जाची योग्य प्रमाणात वसुली करून बँकेला सहकार्य करणाऱ्या पदाधिकारी व सदस्यांचे कौतुक व्हावे या करिता वणी येथे सन्मान सोहळ्याचे आयोजन यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने दि 4 सप्टेंबर ला येथील शेतकरी मंदिरात करण्यात आले होते.

Img 20250601 wa0036

जिल्ह्यात शेतकऱ्यांची सर्वात मोठी बँक म्हणून यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आपली ओळख निर्माण केली आहे. शेतीच्या हंगामात शेतकऱ्यांना बी बियाणे व खते घेण्यासाठी बँक गावातील सहकारी सोसायटी च्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करते.शेतातील उत्पन्न आल्यावर शेतकरी कर्जाची परत फेड करतो.

Img 20250103 Wa0009

सन 2020-2021 या वर्षात वाटण्यात आलेल्या कर्जातील 75 टक्के शेतकऱ्यांनी आपले कर्ज भरून बँकेला सहकार्य केले आहे.या मध्ये गावातील सोसायट्यांचे अध्यक्ष, सचिव व सदस्यांचे योगदान असल्याने त्यांचा सन्मान व्हावा म्हणून या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी आमदार वामनराव कासावार हे होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून रंगनाथ स्वामी पतसंस्थेचे अध्यक्ष देविदास काळे, बँकेचे अध्यक्ष टिकाराम कोंगरे, उपाध्यक्ष वसंत घुईखेडकर,  संजय देरकर, विभागीय अध्यक्ष राजीव येलटीवार, नरेंद्र ठाकरे ,सुरेश काकडे, प्रमोद वासेकर, प्रशांत गोहोकार, मोरेश्वर पावडे, पुरुषोत्तम आवारी, संदीप बुरेवार, प्रशासकीय अधिकारी गोंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण दुधे,  विभागीय अधिकारी किशोर बुच्चे, उपस्थित होते.

यावेळी बोलतांना अध्यक्ष प्रा टीकाराम कोंगरे म्हणाले की आपलीच माणस, आपल्या सेवेत… शेतकऱ्यांचे हीत,  हेच आमचे ब्रीद,  हाच मुख्य धागा धरून सरकार कडून शेतकऱ्यांसाठी देण्यात येणाऱ्या सुविधा विनाविलंब देण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगितले.तर उपाध्यक्ष वसंत घुईखेडकर यांनी बँकेमार्फत शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना विषयी मोलाचे मार्गदर्शन केले.