Home वणी परिसर ऍड. कुणाल चोरडिया यांची पुन्हा अध्यक्षपदी निवड

ऍड. कुणाल चोरडिया यांची पुन्हा अध्यक्षपदी निवड

● नूतन कार्यकारिणी जाहीर, विविध कार्यक्रमांचे आयोजन...

C1 20260823

● नूतन कार्यकारिणी जाहीर, विविध कार्यक्रमांचे आयोजन…

Wani News : Adv. Kunal Chordia re-elected as President येथील ‘जय श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव समिती’ची बैठक शनिवार, 22 ऑगस्ट रोजी निवर्तमान अध्यक्ष ॲड. कुणाल विजय चोरडिया यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत वर्ष 2026-27 साठी ॲड. कुणाल चोरडिया यांची अध्यक्षपदी सर्वानुमते फेरनिवड करण्यात आली.

नवनिर्वाचित अध्यक्षांच्या अनुमतीने समितीची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. उपाध्यक्षपदी शुभम मदान व श्याम लाहारिया, कार्याध्यक्षपदी राहुल मुंजेकर, सहकार्याध्यक्षपदी अभय नागतुरे, सचिवपदी उमेश पोद्दार, सहसचिवपदी सुधीर तालसे, कोषाध्यक्षपदी जयंत पांडे, सहकोषाध्यक्षपदी राजू रिंगोले यांची निवड करण्यात आली.

संयोजकपदी अमोल धानोरकर, प्रसिद्धी प्रमुखपदी आशिष सिसोदिया (जैन), सहप्रसिद्धी प्रमुखपदी दीपक पाऊणकर, सोशल मीडिया प्रमुखपदी पार्थ त्रिवेदी आणि प्रिंट मीडिया प्रमुखपदी सौरभ राजुरकर यांची नियुक्ती करण्यात आली.

Img 20250103 Wa0009

दरम्यान, आगामी त्रिदिवसीय जन्माष्टमी महोत्सवात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसह भव्य रॅलीचे आयोजन करण्याचे बैठकीत निश्चित करण्यात आले. महोत्सवाच्या नियोजनासाठी विविध उपसमित्याही गठित करण्यात आल्या.

दरवर्षीचे प्रमुख आकर्षण असलेली भव्य नृत्य स्पर्धा यंदाही ‘जय श्रीकृष्ण जन्माष्टमी महिला समिती’च्या वतीने मोठ्या स्वरूपात आयोजित करण्यात येणार आहे. यासोबतच वरिष्ठ सल्लागार समितीचीही घोषणा करण्यात आली. बैठकीचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विशाल दूधबळे यांनी केले. यावेळी समितीचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ROKHTHOK