Home वणी परिसर May hit..चा तडाखा, वाढली तापमानाची दाहकता

May hit..चा तडाखा, वाढली तापमानाची दाहकता

● सूर्य आग ओकणार हे आता स्पष्ट झाले आहे. यामुळेच जिल्‍हा प्रशासनाच्‍या वतीने.....

328

आज पारा 43 अंश सेल्‍सीअस पर्यंत

Wani Weather : राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. तापमानात (Temperature) कमालीची वाढ होतांना दिसत आहे. पुढील किमान 10 दिवस उष्ण वातावरण राहण्याची शक्यता वर्तविण्‍यात आली आहे. ‘मे हिट’चा तडाखा आता जाणवायला लागला आहे. It is seen that there is an increase in temperature. Hot weather is expected for at least next 10 days.

Img 20250601 wa0036

तापमानाची दाहकता वाढत असतांनाच रविवारी पारा 43 अंश सेल्‍सीअस पर्यंत वाढणार असल्‍याचे दर्शविण्‍यात आले होते आणि रविवारी दुपारी 2 वाजताच पारा वाढला. काही दिवस सूर्य आग ओकणार हे आता स्पष्ट झाले आहे. यामुळेच जिल्‍हा प्रशासनाच्‍या वतीने मार्गदर्शक सुचना जारी करण्यात आल्या असुन नागरिकांनी खबरदारी घ्‍यावी असे आवाहन करण्‍यात आले आहे.

Img 20250103 Wa0009

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात तापमानाचा पारा वाढला आहे. राज्याच्या विविध भागात उष्णतेचा चटका जाणवू लागला आहे. संपूर्ण विदर्भात तापमानात वाढ झाल्‍याचे दिसत आहे. आज राज्यातील कमाल तापमानात वाढ झाल्‍याचे दिसत असुन उष्णेतेची लाट काही दिवस राहणार असल्‍याने स्‍थानिक नागरिकांनी उष्माघातापासुन बचाव करणेकरिता सतर्क राहून खबरदारी घेणे गरजेचे झाले आहे.

नागरिकांनी काय करावे
● तिव्र उन्हात मुख्यतः दुपारी 12.00 ते 4.00 च्या दरम्यान बाहेर पडणे टाळावे.
● पुरेसे पाणी पित राहावे.
● फक्त हलक्या रंगाचे सुती कपडयाचा वापर करावा.
● घरा बाहेर पडतांना टोपी, गमजा, डोके व तोंड झाकण्यासाठी मोठा रूमाल, छत्री यांचा वापर करावा व सोबत पाणी ठेवावे.
● मद्य, चहा, कॉफी व कार्बोनेटेड शितपेय पिण्याचे टाळावे.
● शिळे अन्न खाणे टाळावे.
● उन्हात काम करत असतांना आपला चेहरा व डोके ओल्या कपडयाने झाकावे.
● चक्कर येत असल्यास किंवा आजारी वाटल्यास त्वरीत डॉक्टरकडे जावे.
● ओआरएस व लस्सी, ताक, लिंबूपाणी इत्यादी घरगुती शितपेयांचे भरपूर सेवन करावे. • प्राण्यांना सावलीत ठेऊन त्यांना भरपूर पाणी प्यायला द्यावे.
● घरामध्ये लहान मुलांकडे विशेष लक्ष द्यावे. उन्हामध्ये खेळण्यासाठी 12 ते 4 या वेळेत मुले बाहेर पडणार नाहीत व दिवसभर पुरेसे पाणी पित राहतील याकडे लक्ष द्यावे.

नागरीकांनी काय करू नये
● दुपारी १२ ते ४ या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे.
● गडद, घट्ट व जाड कपडे घालणे टाळावे.
● बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरीक श्रमाची कामे टाळावीत
● उष्णतेच्या लाटेमुळे आजारी पडलेल्या व्यक्तीला एखाद्या थंड जागी ठेवा. शरीराचे तापमान खाली आणण्याचे प्रयत्न करा.
● ओल्या कपडयाने त्यांना पुसत रहा. डोक्यावर थंड पाणी टाका.
● आजारी व्यक्तीला ओआरएस व लस्सी, ताक,  लिंबूपाणी इत्यादी घरगुती शितपेय द्यावे.
● आजारी व्यक्तीला ताबडतोय जवळच्या आरोग्य केन्द्रात न्यावे व त्वरीत हॉस्पीटलमध्ये दाखल करून उपचार सुरु करणे गरजेचे आहे. कारण उष्माघात घातक ठरू शकते.
Rokhthok News