Home Breaking News दणदणीत स्पर्धेचा उत्सव, प्रज्वलन कलामहोत्सव

दणदणीत स्पर्धेचा उत्सव, प्रज्वलन कलामहोत्सव

196

एकल व समूह नृत्य, गीतगायन, काव्य व रांगोळी…
औचित्य क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे

रोखठोक | विश्वभूषण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून दणदणीत स्पर्धेचा उत्सव, प्रज्वलन कलामहोत्सव साजरा होत आहे. एकल व समूह नृत्य, गीतगायन, काव्य व रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 3 जानेवारीला धनोजे कुनबी सांस्कृतिक सभागृहात रंगारंग कार्यक्रमाची लयलूट अनुभवता येणार आहे.

सकाळी 10 वाजता उद्घाटन सभारंभ होणार असून त्यानंतर रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. जनजागृतीपर पोस्टर रांगोळी स्पर्धेत महीला पुरूष सहभागी होऊ शकतात. ही स्पर्धा सकाळी 8 ते 10 वाजता पर्यंत असणार आहे.

सकाळी10.30 ते दुपारी 1.00 वाजता पर्यंत एकल नृत्य असेल. 4 मिनिटांची वेळमर्यादा असलेल्या या स्पर्धेत मराठी, हिंदी, तेलगू, गोंडी, बंजारा, पंजाबी या भाषेतील एका गाण्यावर नृत्य सादर करता येईल. दुपारी 1.00 ते दुपारी 3.00 वाजता पर्यंत गीतगायन स्पर्धा घेण्यात येणार आहे. मराठी, हिंदी कोणत्याही एका भाषेत एक गीत सादर करता येईल.

काव्य स्पर्धा दुपारी 3.00 ते सायं 5.00 वाजता पर्यंत असेल कोणत्याही एका विषयावर हिंदी किंवा मराठी भाषेत एक कविता सादर करता येणार आहे. सायं 5.00 ते संध्याकाळी 8.30 वाजता पर्यंत समुह नृत्य ही स्पर्धा होणार यात मराठी, हिंदी, तेलगू, गोंडी, पंजाबी भाषेतील एका गाण्यावर नृत्य सादर करता येईल. विजेत्यांना रात्री 8:30 वाजता नंतर बक्षीस वितरण करण्यात येणार आहे.

प्रज्वलन कलामहोत्सवातील स्पर्धेत सहभाग नोंदवताना काही नियम व अटीचे पालन करावे लागणार आहे. प्रत्येक स्पर्धेची प्रवेश फी 100 रूपये असून प्रत्येकी तिन विजेत्यांना आकर्षक शिल्ड व प्रमाणपत्र देण्यात येईल व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

प्रत्येक स्पर्धेतील जागा नियोजीत आहे त्याकरिता लवकरात लवकर सहभाग घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे
प्रवेश संपर्क
विनोदकुमार आदे- 8788473009, शैलेश आडपवार- 9764716124, आनंद नक्षणे- 9767112410, शंकर घुगरे –9657440743, आकाश महाडुळे – 9922372040, अमन कुल्दीवार-9623396211