Home About Us

About Us

गुरुपौर्णिमाचे औचित्य साधून आम्हीरोखठोक‘ नामक न्यूज पोर्टल सुरु करतोय. सदोदित आपले सहकार्य आम्हास लाभणार आहेतच परंतु गुरुर्ब्रम्हां गुरुर्विष्णू, गुरु देवो महेश्वरः, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः या मंत्राची प्रचिती आम्हाला अनुभवता येणार आहे. आम्ही ‘रोखठोक‘ लिखाण केले तरी वाचक म्हणुन आपणच आमचे गुरु असणार आहात.

वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.

गुरुपौर्णिमाला एक वेगळे आणि खूपच खास महत्त्व आहे. आषाढ पौर्णिमेला दरवर्षी गुरुपौर्णिमा साजरी करण्यात येते. आज 23 जुलै ला गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असंही म्हटलं जातं. व्यास ऋषींचे स्मरण करण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी करण्यात येते. या दिवशी आपल्या गुरुंचा आदर आणि त्यांच्याप्रती असलेले प्रेम व्यक्त करण्यात येते. धर्मग्रंशातही गुरुचे स्थान हे भगवंतांच्या बरोबरीचे असल्याचे म्हटले जाते. आपले गुरुच आपल्या ज्ञानात भर घालतात आणि त्यांनी दाखविलेल्या मार्गानेच आपण पुढे वाटचाल करत असतो. वाचक मित्रांनो आपणच आमचे गुरु आहात आपले अनमोल मार्गदर्शन, सहकार्य आम्हास मिळावे हिच ईश्वर चरणी प्रार्थना.