Home वणी परिसर आणि….राज ठाकरे यांनी दिल्या उंबरकरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा….

आणि….राज ठाकरे यांनी दिल्या उंबरकरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा….

● लोकनेत्यांचा वाढदिवस जल्लोषात

1276
Img 20240613 Wa0015

लोकनेत्यांचा वाढदिवस जल्लोषात

Raju Umbarkar News | गुरू…दैवत… आणि सर्वस्व असलेल्या पक्ष प्रमुखांचा वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा व शुभाशीर्वाद मिळणं हे भाग्यात असावं लागतं. शनिवारी सकाळी 9: 30 वाजताच्या दरम्यान राज ठाकरे यांनी भारदस्त आवाजात राजू उंबरकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व शुभाशीर्वाद देत वणीला येणारच असा शब्द दिला. Raj Thackeray in a loud voice wished Raju Umbarkar a happy birthday and gave a word that Wani will come.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर यांचा वाढदिवस महाराष्ट्र सैनिक धडाक्यात साजरा करताहेत. कार्यकर्त्यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सामाजिक उपक्रमांसह यज्ञ, महाआरती करण्यात येत आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून पक्षात कार्यरत राजू उंबरकर यांनी अनेक चढउतार बघितले. विदर्भातील मनसेचा गढ समजल्या जात असलेल्या वणी विधानसभा क्षेत्रात मजबूत संघटनात्मक बांधणी त्यांनी केली. प्रथमतः जिल्हा परिषद व पंचायत समितीत मनसेने खाते उघडले तर पालिकेवर झेंडा फडकवला होता.

वणी विधानसभा मतदारसंघात मनसेचा ग्राफ सातत्याने वाढताना दिसत आहे. राज्य व केंद्रात मोदी लाटेची त्सुनामी असताना उंबरकर यांनी आपला जनाधार शाबूत ठेवला आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत सुरवातीच्या 9 फेऱ्यात उंबरकरांनी आघाडी घेतली होती. याचा धसका तत्कालीन पुढाऱ्यांनी घेतला होता.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मतदारसंघात जोरदार मोर्चे बांधणी केली आहे. टार्गेट 2024 च्या विधानसभा निवडणुकीचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन वाटचाल सुरू आहे. तरुण कार्यकर्त्यांची फौज जनहितार्थ सामाजिक कार्यासाठी झटताहेत. त्यातच राजू उंबरकर यांचा वाढदिवस कार्यकर्त्यांसाठी ऊर्जा आणि उत्साह वाढवणारी आहे.
Rokhthok News

C1 20240529 15445424