Home Breaking News चक्क….बँकेतूनच उडवले ‘अकरा’ हजार रुपये

चक्क….बँकेतूनच उडवले ‘अकरा’ हजार रुपये

1201
Img 20250630 wa0035

महाराष्ट्र बँकेतील प्रकार
सीसीटीव्ही फुटेज दाखवण्यास नकार..!

वणी: दरमहा मिळणाऱ्या पेन्शनवर आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे अकरा हजार रुपये बँकेतूनच लंपास करण्यात आले. ही घटना सोमवार दि.1 ऑगस्ट ला घडली. बँकेतच घडलेल्या घटनेमुळे बँकेची सुरक्षाच धोक्यात आली असून त्यावेळेसचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे सौजन्य व्यवस्थापकाने न दाखवल्याने ग्राहकात रोष निर्माण होत आहे.

Img 20250630 wa0037

देविदास गोसाई पेंदोर (57) असे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे नाव आहे. ते लक्ष्मी नारायण अपार्टमेंट छोरीया ले आउट येथे वास्तव्यास आहेत. ते रेल्वे खात्यामध्ये गॅगमन म्हणून कार्यरत होते. आता ते सेवानिवृत्त झाले असून त्यांना 17 हजार रुपये पेन्शन मिळते. या मिळणाऱ्या पैशात त्यांच्या परिवाराचा उदरनिर्वाह होतो.

Img 20250103 Wa0009

घटनेच्या दिवशी ते महाराष्ट्र बँकेतून आपल्या हक्काचे पैसे काढण्यासाठी सकाळी 11 वाजता गेले होते. त्यांनी आपल्या खात्यातून 11 हजार रुपये काढले. रोखपलाने 500 रुपयाच्या 22 नोटा दिल्या. त्यांनी ती रक्कम आपल्या पॅन्ट च्या उजव्या खिशात ठेवली व पासबुक वर एन्ट्री करण्यासाठी ते रांगेत उभे राहिले. काही क्षणातच त्यांच्या खिशातील रोकड लांबवल्याचे त्यांच्या लक्षात आले.

भांबावलेल्या अवस्थेत ते छोरीया वसाहत परिसरातील आपल्या घरी परतले. शेजारी राहणाऱ्या सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक दशरथ राजूरकर यांना घडलेली हकीकत सांगितली. दोघांनी बँक गाठली व घडलेला प्रकार बँक व्यवस्थापकाला सांगितला आणि सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची विनंती केली. मात्र व्यवस्थापकांनी टाळाटाळ करत पोलिसात तक्रार दाखल करण्याची सूचना दिली. या प्रकरणी पोलिसात तक्रार नोंदवली असून अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वणी: बातमीदार