Home Breaking News भीषण….दोन ट्रक समोरासमोर भिडले, चालक ठार

भीषण….दोन ट्रक समोरासमोर भिडले, चालक ठार

1176

वरोरा मार्गावरील घटना

रोखठोक | वरोरा मार्गावर नायगाव जवळील पेट्रोल पंपाच्या समोरच दोन ट्रक समोरासमोर एकमेकांना भिडले. हा भीषण अपघात गुरुवार दि. 2 फेब्रुवारीला सकाळी 8 वाजता घडला यात एक ट्रक चालक ठार तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे.

वणी- वरोरा मार्गाचे नव्याने बांधकाम होत असल्याने काही ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू आहे. त्यातच मागील काही महिन्यात या मार्गावर अपघाताचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. सातत्याने होणाऱ्या अपघातात नाहक बळी पडत असल्याचे दिसून येत आहे.

वरोरा मार्गावरील नायगाव हद्दीत गुरुवारी सकाळी विरुद्ध दिशेने येणारे दोन ट्रक एकमेकांना समोरासमोर भिडले. या भीषण अपघात एक ट्रक चालक चिरडल्या गेला, त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर दुसऱ्या ट्रक मधील चालक गंभीर जखमी झाला आहे.

घटना घडताच प्रत्यक्षदर्शींची गर्दी जमली, तसेच पोलिसांना सूचित करण्यात आले. जखमींला तातडीने उपचारार्थ हलविण्यात आले असून मृतकाचे शव ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. या घटनेतील जखमी व मृताचे नाव कळू शकले नाही. पुढील तपास पोलीस करताहेत.
वणी: बातमीदार