Home Breaking News मनसे नेत्यावर हल्ला, कार्यकर्ते आक्रमक

मनसे नेत्यावर हल्ला, कार्यकर्ते आक्रमक

1851
C1 20240404 14205351

वणीत चक्काजाम, वाहतूक खोळंबली

रोखठोक | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा प्रवक्ते यांच्यावर 4 अज्ञातांनी भ्याड हल्ला केला. याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले आहे. वणीत प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार व महाराष्ट्र सैनिकांनी लालपुलिया परिसरात शुक्रवारी सायंकाळी चक्काजाम केले. यामुळे बराच काळ महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती.

मुंबई येथील शिवाजी पार्क परिसरात सकाळी संदीप देशपांडे हे मॉर्निंग वॉक करत असताना चार अज्ञात तरुणांनी भ्याड हल्ला केला. यावेळी मारेकरी तोंडाला रुमाल बांधून होते. क्रिकेटच्या स्टंम्पने ही मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात जखमी झालेल्या देशपांडेवर मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले.

या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले आहे. मनसेच्या नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया देत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत तर हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी सुद्धा तीव्र संताप व्यक्त केला आहे.

वणी परिसरातील लाल पुलिया महामार्गावर मनसे तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार व कार्यकर्त्यांनी रस्तारोको करून तीव्र निषेध नोंदविला. यावेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.

यावेळी चक्काजाम आंदोलनात मनसे शहराध्यक्ष शिवराज पेचे, आजिद शेख, शहर उपाध्यक्ष गितेश वैद्य, इरफान सिद्दीकी, बंडू बोंडे, वैभव पुरानकर, रणजीत पिंगे, लोकेश लडके, आकाश काकडे, अमोल जेऊरकर, अराफत खान, अक्षय मोहूर्ले यांच्यासह महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
वणी : बातमीदार

Previous articleती …आत्महत्या सासरच्या जाचानेच..!
Next articleJCI वणी सिटी पदग्रहण सोहळा उत्साहात
Whatsapp Image 2021 07 18 At 1.43.51 Pm (1)
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.