Home Breaking News अवयवदान करून दुसऱ्यांच्या जीव वाचवूया..!

अवयवदान करून दुसऱ्यांच्या जीव वाचवूया..!

141

जनता विद्यालयात जनजागृती

वणी बातमीदार:- आरोग्य व आपल्या शरीराच्या अवयवाचे दान करण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. अवयवदान करून दुसऱ्यांच्या जीव वाचवूया..! याबाबत जनता विद्यालयात मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक यशवंत ढवस, प्रमुख अतिथी उपमुख्याध्यापक गणेश खंडाळकर तर मार्गदर्शिका प्रार्थना द्विवेदी (प्रत्यारोपण समन्वयक) नागपूर ह्या उपस्थित होत्या.

यावेळी मानवाच्या शरीर व वेगवेगळ्या अवयवाची माहिती दिली. त्यात डोळे, त्वचा, किडनी, अस्थि ह्या सर्व अवयवांचे आपण दान करून दुसऱ्या व्यक्तीचे जिवन वाचवू शकतो. तसेच डोळे देऊन आपण दुसऱ्या व्यक्तीच्या माध्यमाने हे अग पुन्हा बघु शकतो. हा सामाजिक कर्तव्यनिष्ठ संदेश आपल्या मार्गदर्शनातून प्रार्थना दिवेदी यांनी दिला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैशाली पेटकर पर्यवेक्षक यांनी केले, आभार  गजेंद्र काकडे यांनी मानले, संचालन नरेश बेलेकर यांनी केले. तसेच या कार्यक्रमात सर्व शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद उपस्थित होते.