Home Breaking News त्या चार विधानसभा ठरतील “गेम चेंजर”

त्या चार विधानसभा ठरतील “गेम चेंजर”

● मताधिक्य टिकवण्याचं कॉंग्रेसपुढे आव्हान ● बेरीज वजाबाकीचे गणित "टर्निंग पॉईंट"

1854
C1 20240404 12291834

 मताधिक्य टिकवण्याचं कॉंग्रेसपुढे आव्हान
 बेरीज वजाबाकीचे गणित “टर्निंग पॉईंट”

सुनील पाटील, वणी | चंद्रपुर -वणी- आर्णी लोकसभेच्‍या सार्वञिक निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. कॉग्रेसच्‍या प्रतिभा धानोरकर तर भाजपाचे सुधीर मुनगंटीवार यांच्‍यात लक्षवेधी लढत होणार आहे. मागील निवडणुकीत चार विधानसभा मतदारसंघात कॉग्रेसला एक लाखाच्‍या वर मताधिक्‍य होते. त्‍याच चार विधानसभा यावेळी “गेम चेंजर” ठरतील असे वाटत असले तरी मताधिक्‍य टिकवण्‍याचं आव्‍हान कॉग्रेसपुढे आहे. It will be a “game changer” during the four assembly constituencies.

लोकसभेच्‍या सतराव्‍या सार्वञिक निवडणुकीत कॉग्रेसचे उमेदवार दिवंगत खासदार बाळु धानोरकर यांनी भाजपाच्‍या हंसराज अहिर यांचा 44 हजार 763 मताधिक्‍याने पराभव केला होता. पुर्वापार भाजपाचा असलेला गड ताब्‍यात घेत राज्‍यात एकमेव जागा कॉग्रेसने जिंकली होती. कॉग्रेसमुक्‍त महाराष्‍ट्र करण्‍याचे भाजपाचे स्‍वप्‍न कॉग्रेसच्‍या धानोरकरांनी ध्‍वस्‍त केले होते.

चंद्रपुर -वणी- आर्णी लोकसभा मतदारसंघात मागील निवडणुकीत राजुरा (35 हजार 252), चंद्रपुर (25 हजार 931), बल्‍लारपुर (30 हजार 61) व वरोरा भद्रावती (12 हजार 460) असे एक लाख तीन हजार 684 एवढे मताधिक्‍य कॉग्रेसला मिळाले होते. सध्‍यस्थितीत या चार विधानसभेत पक्षीय बलाबल बघता वरोरा- भद्रावती काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर, बल्लारपूर भाजपचे सुधीर मुनगंटीवार, चंद्रपूर अपक्ष किशोर जोरगेवर व राजुरा येथे काँग्रेसचे सुभाष धोटे हे आमदार आहेत.

लोकसभेच्‍या अठराव्‍या सार्वञिक निवडणुकीत भाजपाने सुधीर मुनगंटीवार हा तगडा उमेदवार रिंगणात उतरवला आहे. तर कॉग्रेस पक्षाने दिवंगत खासदार बाळु धानोरकर यांच्‍या पत्‍नी आ. प्रतिभा धानोरकर यांना निवडणुक रिंगणात उतरवले आहे. कॉग्रेसचा जनाधार, जातीय समिकरण व सहानुभूतीचा फायदा धानोरकरांना मिळेल असे बोलल्‍या जात असले तरी विकासपुरुष म्‍हणुन मुनगंटीवार समोर येताहेत.

मागील निवडणुकीत चंद्रपुर जिल्‍हयातील चारही विधानसभा मतदारसंघात भाजपा पिछाडीवर होती. त्‍यातच मुनगंटीवार यांचा प्रभाव असलेल्‍या बल्‍लारपुर व चंद्रपुर येथे कॉग्रेसला 55 हजार 992 मतांची आघाडी मिळाली होती तर चारही मतदारसंघात एक लाख तीन हजार 684 एवढे मताधिक्‍य कॉग्रेसला होते ते टि‍कवण्‍याचे आव्‍हान असेल. त्‍याप्रमाणेच यवतमाळ जिल्‍हयातील वणी व आर्णी विधानसभेने भाजपाला 59 हजार 695 मताधिक्‍य मिळवुन दिले होते. या निवडणुकीत कॉग्रेस व भाजपा नेमकी कोणती रणनिती आखणार व “टर्निंग पॉईंट” असलेल्‍या बेरीज- वजाबाकीच्‍या गणितात कोण बाजी मारणार हे कालांतराने स्‍पष्‍ट होणार आहे.
Rokhthok News