Home Breaking News आणि…..डॉ. महेंद्र लोढा यांनी दिला “राजीनामा”

आणि…..डॉ. महेंद्र लोढा यांनी दिला “राजीनामा”

● पत्रकार परिषदेत आरोपांचे खंडन

4180
C1 20240404 14205351

पत्रकार परिषदेत आरोपांचे खंडन

Wani News | ग्रामीण रुग्‍णांलयात जन्‍मलेल्‍या नवजात बाळाच्‍या पोटातील भाग बाहेर आल्‍याचा प्रकार घडला होता. या प्रकरणी बाळाच्‍या वडीलांनी डॉ. महेंद्र लोढा यांचेवर हलगर्जीपणाचा आरोप करत पोलीसांत तक्रार देत कारवाईची मागणी केली आहे. तसेच समाज माध्‍यमातुन विशिष्ट लोकांकडून आरोप होताहेत. यामुळे व्‍यथीत झालेल्‍या डॉ. लोढा यांनी मानसेवी वैद्यकीय अधिकारी पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला व होत असलेल्‍या आरोपांचे खंडन पञ परिषदेत केले. Dr. Lodha hastily resigned from the post of Mansevi Medical Officer

येथील प्रसिध्‍द स्‍ञी रोग तज्ञ डॉ. लोढा हे ग्रामीण रुग्‍णांलयात मानसेवी म्‍हणुन काम करतात. सरकारी दवाखान्‍यातील प्रसुती, सिझर आणि संबधीत बाबी ते हाताळतात. त्‍याप्रमाणेच त्‍यांचा येथे मल्‍टीस्‍पेशालीटी दवाखाना आहे. सामाजीक दायित्‍व जोपासत गोर गरीबांची सेवा व्‍हावी याकरीता ते सरकारी दवाखान्‍यात आपली सेवा बजावताहेत.

नरेंद्र शंकर बुजाडे यांच्‍या पत्‍नी भाग्‍यश्री यांना 29 जुलैला राञी ग्रामीण रुग्‍णांलयात प्रसुती करीता दाखल केले. प्रसुती झाल्‍यावर नवजात बाळाच्‍या पोटातील भाग बाहेर आल्‍याचे निदर्शनांस आले यामुळे त्‍या बाळावर शस्‍ञक्रिया होणे गरजेचे होते. याप्रकरणी संतप्‍त परिवाराने डॉ. लोढा यांचेविरुध्‍द पोलीसात तक्रार करत कारवाईची मागणी केली आहे.

नवजात बाळाच्‍या वडीलाने पोलीसात दिलेल्‍या तक्रारीनुसार गर्भवती पत्‍नीवर ग्रामीण रुग्‍णांलयात उपचार सुरु होते. तपासणी नंतर डॉ. लोढा यांनी तिसऱ्या व सहाव्‍या महिन्‍यात लोढा मल्‍टीस्‍पेशालीटी हॉस्‍पीटलमध्‍ये सोनोग्राफी करण्याचे सुचवले. या दोन्ही रिपोर्ट मध्ये बाळ निरोगी व सुदृढ असल्‍याचे सांगीतले. माञ बाळ अपंग जन्‍माला आल्‍याचा आरोप करण्‍यात आला आहे.

या धक्‍कादायक प्रकरणी शहरात समाज माध्‍यमातुन डॉ. लोढा यांना टार्गेट केल्‍या जात आहे. तसेच नानाविध आरोप करण्‍यात येत आहे. होणाऱ्या आरोपामुळे डॉ. लोढा यांनी पञकार परिषद घेत आरोपाचे खंडन केले. तसेच ग्रामीण रुग्‍णांलयातील मानसेवी पदाचा राजीनामा दिल्‍याचे स्‍पष्‍ट करत यापुढे सरकारी दवाखान्‍यात काम करणार नसल्‍याचे सांगीतले. त्‍याप्रमाणेच सोनोग्राफी करतांना बाळाच्‍या शरिराखालील दबलेला भाग दिसत नसल्‍याचे सांगीतले व बाळावर तातडीने शस्‍ञक्रिया करणे गरजेचे असल्‍याचे स्‍पष्‍ट केले.
Rokhthok News