Home वणी परिसर “जिथे कमी तिथे आम्ही” या धगधगत्या विचारांचा सोहळा

“जिथे कमी तिथे आम्ही” या धगधगत्या विचारांचा सोहळा

● उपविभागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव ● अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य

176

उपविभागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य

Wani News | अण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंतीचे औचित्यसाधून “मादगी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने रविवार दि.6 ऑगस्टला दुपारी 12.00 वाजता येथील वसंत जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरीच्या सभागृहात सोहळा होणार आहे. “जिथे कमी तिथे आम्ही” हा धगधगता विचार मनाशी बाळगून आर्थिकदृष्ट्या कमकुवत असतानाही विपरीत परिस्थितीत पुढे जाण्याऱ्या मादगी समाजातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. A felicitation ceremony has been organized for the students of Madagi community.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी नायब तहसीलदार चरणदास कोंडावार तर कार्यक्रमाचे उदघाटक महासचिव मोची, मादगी, मादरु, मादिगा, महासंघ M4 चे सुनिल मिद्दे असणार आहेत. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, प्रा. डॉ. करमसिंग राजपुत, प्रमुख पाहुणे म्हणून मा. ऍड. गजानन अंबलवार, मुरलीधर लाटेलवार हे असतील.

वणी उपविभागात पहिल्यांदाच हा गुणवंत विद्यार्थी यांचा गुणगौरव व विद्यार्थी मार्गदर्शन सोहळा मादगी समाजाचा वतीने संपन्न होत आहे तरी समस्त पालकांनी उपस्थित राहावे असे आवाहन समितीचे अध्यक्ष निलेश परगंटीवार, उपाध्यक्ष चरणदास कोंडावार, सचिव सुरज चाटे, सहसचिव रवि कोमलवार, कोषाध्यक्ष नथ्थुजी नगराळे, प्रकाश तालावार, राकेश शंकावार, अरुण एनपल्लीवार, विक्की परगंटीवार, शिवकुमार नलभोगे, प्रभाकर लिक्केवार, कैलास पौन्नलवार, नागेश मोहरले या आयोजकांनी केले आहे.
Rokhthok News