Home Breaking News कत्तलीकरिता नेत असलेल्या गोवंशाची सुटका

कत्तलीकरिता नेत असलेल्या गोवंशाची सुटका

● LCB पथकाच्या दोन कारवाया ● 6:40 लाखाचा मुद्देमाल जप्त

1121
C1 20231204 17240969

LCB पथकाच्या दोन कारवाया
6:40 लाखाचा मुद्देमाल जप्त

Wani News : LCB पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गोवंशाची कत्तलीकरिता तस्करी करणाऱ्याच्या मुसक्या अवळण्यात आल्या आहेत. दोन कारवाईत 30 गोवंशाची सुटका करण्यात आली असून आठ गोवंश तस्कराना ताब्यात घेण्यात आले तर 6 लाख 40 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई 4 डिसेंबर ला पहाटे करण्यात आली. Based on the confidential information received by the LCB team, the smugglers of cattle for slaughter have been busted.

गोवंश तस्कर अवैद्यरित्या पिकअप वाहनातुन कत्तलीकरिता जनावर तेलंगाणा राज्यात नेत असल्याची गोपनीय माहिती LCB पथकाला मिळाली. मुकुटबन ते येडशी मार्गावर पहाटे तीन वाजताच्या सुमारास सापळा रचून चौघांना ताब्यात घेण्यात आले. यावेळी पिकअप वाहन क्रमांक TS-10-UB-8687 ची तपासणी केली असता त्यात निर्दयपणे दाटीवाटीने जनावरे कोंबून असल्याचे आढळून आले.

या कारवाईत फयाम गफार शेख (32) रा. वार्ड क्र.4, मुकुटबन, सददम ऊर्फ सय्यद शाकीब सय्यद महमुद (32) रा. चिखलवर्धा ता. घाटंजी, संदीप निंबाजी सोयाम (49) रा. पिपरडवाडी, ता. झरीजामणी व राजु निंबाजी सोयाम (25) रा. पिंपरडवाडी, ता. झरीजामणी याना ताब्यात घेण्यात आले.

LCB  पथक गोवंश तस्करीची कारवाई करून मुकूटबन वरून वणीकडे परतताना खडकी गणेशपुर परिसरात काही व्यक्ती 10 ते 15 बैल मांगली मार्गे तेलंगना राज्यात कत्तली करीता घेवुन जात असल्याची टीप LCB पथकाला मिळाली.

LCB पथकाने मांगली चौपाटी येथे थांबुन त्या जनावरांना हाकत असलेल्या सचिन महादेव थेरे (38), देविदास नानाजी भोसकर (45), रमेश शालीकराव पेन्दोर (41), शत्रूघन नथ्थु घोरफडे (45) सर्व राहणार तुंड्रा, ता. वणी याना विचारणा केली. यावेळी ती जनावरे अस्लम कुरेशी व सलीम कुरेशी रा. बेला जि. आदीलाबाद (तेलंगणा) यांचे मालकीची असल्याचे सांगितले. पोलिसांनी बैलाची तस्करांच्या ताब्यातून सुटका करून गुन्हा दाखल केला आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. श्री. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, पो.नि. स्थागुशा LCB आधारसिंग सोनोने यांचे मार्गदर्शनात API अतुल मोहनकर, अमोल मुडे, योगेश डगवार, सुनिल खंडागळे, सुधिर पांडे, सुधिर पिदुरकर, रजनिकांत मडावी, सतिश फुके यांनी केली.
Rokhthok News