Home Breaking News ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला मारहाण, गुन्हा नोंद

ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला मारहाण, गुन्हा नोंद

1685
C1 20240404 14205351

नांदेपेरा येथील घटना

वणी: नांदेपेरा येथील ग्रामपंचायतच्या पाणीपुरवठा कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आल्याची घटना मंगळवारी दुपारी तीन वाजता घडली. घरकुल योजनेचा लाभ का मिळाला नाही या कारणावरून चक्क त्याच्या डोक्यात लाकडी पाटी मारून जखमी केले. याप्रकरणी वणी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पांडुरंग गणपत मडावी (45) असे आरोपीचे नाव असून तो नांदेपेरा येथील निवासी आहे. घटनेच्या दिवशी तो दुपारी ग्रामपंचायत कार्यालयात पोहचला. घरकुल का मिळाले नाही असे म्हणत त्याने पाणीपुरवठा कर्मचारी अनंता दत्तुजी वांढरे (45) यांचे सोबत वाद घातला.

ग्रामपंचायत कार्यालयासमोरच त्या दोघात घरकुला वरून शाब्दिक चकमक झाली. वादाचे पर्यावसान मारहाणीत झाले. जवळच असलेल्या लाकडी पाटीने मडावी याने वांढरे याच्या डोक्यात जबर प्रहार केला. रक्तस्त्राव होत असल्याने ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने तडक वणी पोलीस ठाणे गाठून रीतसर तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत आरोपीवर गुन्हा नोंद केला आहे.
वणी: बातमीदार