Home क्राईम दारूसाठी महिलांची पोलीस स्टेशनवर धडक

दारूसाठी महिलांची पोलीस स्टेशनवर धडक

560

अवैध दारू विक्री बंद करा 

तालुक्यातील अनेक गावांमध्ये अवैधरित्या दारू विक्री सुरू आहे. त्यामुळे महिला व लहान मुलांवर यांचे विपरीत परिणाम होत असल्याने संतप्त महिलांनी गावात सुरू असलेली अवैध दारू बंद करण्यासाठी पोलीस स्टेशन वर धडक दिली.

मूर्धोनी या गावात मागील 4 ते  6 महिन्यापासून गावातील काही  लोक अवैध दारू विकून कायदा व सुव्यवस्था भंग करीत आहे. त्यामुळे महिलांवरील अत्याचारात वाढ होऊन  शाळकरी मुले देखील व्यसनाच्या आहारी जात आहे.

यामुळे पालकांमध्ये देखील चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. महिलांना रस्त्याने जाणे येणे करणे देखील कठीण झाले आहे. त्यामुळे महिलामध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.

श्री गुरुदेव सेनेचे तालुका संघटक भारत कारडे, महिला संघटिका प्रिया फालके, ग्रा. पं. सदस्य, पंढरीनाथ राजूरकर, प्रकाश धुळे, पूजा आंदे, माजी सरपंच पंढरीनाथ आवारी, व्यसनमुक्ती सदस्य, राहुल धुळे, श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या प्रमुख बेबी कारडे यांचे नेतृत्वात सुमारे 50 ते 60 महिला व पुरुषांनी पोलीस स्टेशनवर धडक दिली व दारुबंद करण्याची मागणी केली.

यावेळी श्री गुरुदेव सेनेचे अध्यक्ष दिलीप भोयर हे उपस्थित होते. निवेदन देताच उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पूजलवार यांनी पोलीस उपनिरीक्षक शिवाजी टिपूर्णे यांचे नेतृत्वाखाली तात्काळ एक पथक तयार करून दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाही करण्यासाठी रवाना केले आहे. यापुढे काय होणार याकडे लक्ष लागले आहे.

वणी-बातमीदार