Home Breaking News पुन्हा …..दुसऱ्यांदा बालकाच्या अपहरणाचा प्रयत्न..!

पुन्हा …..दुसऱ्यांदा बालकाच्या अपहरणाचा प्रयत्न..!

4521
Img 20240613 Wa0015

पालक वर्गात भीतीचे वातावरण
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

वणी: अवघ्या दोन दिवसांपूर्वी नांदेपेरा मार्गावर चारचाकी वाहनातून आलेल्या भमट्यानी बालकाच्या अपहरणाचा प्रयत्न केला होता. तशीच पुनरावृत्ती गुरुवार दि. 6 ऑक्टोबर ला सकाळी मोमीनपुरा परिसरात घडली. दुचाकीवर आलेल्याने 13 वर्षीय बालकाचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला यामुळे चांगलीच खळबळ माजली आहे.

दोन दिवसापूर्वी अशीच घटना घडल्याची हकीकत त्या बालकाने कथन केली होती तसाच प्रकार पुन्हा घडला. आजच्या घटनेत प्रसंगावधान राखून चालत्या दुचाकीवरून बालकाने उडी मारल्याने अघटित टळलं. घडलेल्या प्रकारामुळे पालक वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कायदा व सुव्यस्था ऐरणीवर आली आहे.

मोमीनपुरा येथे वास्तव्यास असलेला बालक मदरशात जात असताना आशियाना हॉल जवळ एक अज्ञात दुचाकीस्वार आला. “चल मै तुझे छोड देता” असे म्हणत त्याला दुचाकीवर बसवले. परंतु मदरशा जवळ तो न थांबता तो सरळ भरधाव निघाला. बालकाने त्याला विचारणा केली असता “तू गप्प बसून रहा” असे म्हणाला.

बालकाने काहीतरी वेगळेच घडत असल्याचे ओळखले आणि चालत्या दुचाकीवरून उडी मारून पळ काढला. घडलेली हकीकत त्याने व घटनास्थळी उपस्थित असणाऱ्यां नागरिकांनी आमच्या प्रतिनिधी जवळ सांगितली. या प्रकरणी पोलिसांना कळवण्यात आले असून पोलीस प्रत्यक्षदर्शी बालक व स्थानिकांना विश्वासात घेवून  सत्यता पडताळत आहे.

दोन दिवसापूर्वी नांदेपेरा मार्गावरील नगर परिषद शाळा क्रमांक 5 समोर एका चारचाकी वाहनातून दोन अज्ञात इसम तोंडाला रुमाल बांधून असलेले खाली उतरले व त्या बालकाला बळजबरीने वाहनात कोंबण्याचा प्रयत्न केला होता. असे त्या बालकाने सांगितले होते, तसेच मोमीनपुरा येथील बालक सुद्धा सांगत असल्याने प्रकरणाचे गांभीर्य तपासणे गरजेचे झाले आहे.
वणी: बातमीदार

ही बातमी सुद्धा वाचा….

https://rokhthok.com/2022/10/06/17656/

C1 20240529 15445424