Home Breaking News Unseasonal rains: विजेचा गडगडाट आणि धुव्वाधार पाऊस

Unseasonal rains: विजेचा गडगडाट आणि धुव्वाधार पाऊस

● अवकाळी पावसाने घातले थैमान

963

अवकाळी पावसाने घातले थैमान

Unseasonal rains : wani | अवकाळी पावसाने उप विभागात चांगलेच थैमान घातले आहे. मागील काही दिवसांपासून दररोज विजेचा गडगडाट आणि धुव्वाधार पाऊस पडत आहे. रविवारी दुपारी 3:30 वाजताच्या दरम्यान पावसाने विजेच्या गदारोळासह हजेरी लावल्याने शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. Unseasonal rains have lashed the sub-division well.

लग्न सराई चा मोसम आहे, त्यातच पावसाचे अवकाळी तांडव नागरिकांना सहन करावे लागत आहे. उन्हाळ्यात कोसळणाऱ्या पावसामुळे ऋतू बदल तर झाला नाहीना अशी शंका उपस्थित होत आहे. खरिपात याचे परिणाम भोगावे लागतील अशी शक्यता नाकारता येत नाही.

अवकाळी पावसाने परिसरात चांगलेच थैमान घातले असून बळीराजाला भविष्यातील चिंता सतावत आहे. उन्हाळ्यातील एप्रिल महिन्यात आग ओकणारा सूर्यदेव सध्या क्रोधीत झालेला नाही. मे हिट ची गरज लक्षात घेता अवकाळी पावसाने निर्माण केलेला व्यत्यय खरीप हंगामासाठी घातक परिणाम करणारा ठरणार आहे.
वणी : बातमीदार